मुंबई - Yakub Memon Grave Controversy मुंबईमध्ये 1993 साली बॉम्ब ब्लास्ट झाले होते आणि या बॉम्बब्लास्टमधील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीवर सजावट केल्याने भाजपाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र कब्रस्तानबाबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या माजी महापौर पेडणेकर Ex Mumbai Mayor Kishori Pednekar तसेच भाजपा नगरसेवक सहभागी असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच कबरीबाबत धमकी देणाऱ्या रौफ मेमन याच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांचाही फोटो समोर आला आहे.
माजी महापौर, भाजपाचा नगरसेवक बैठकीत -मुंबईमधील बडा कब्रस्तान येथे १९९३ बॉम्बब्लास्टमधील आरोपी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर दफन करण्यात आले आहे. त्याच्या कबरीवर सजावट करण्यात आली होती, एलईडी लायटिंग करण्यात आली होती. यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले. हे आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी फेटाळले आहेत. मात्र आता बडा कब्रस्तान संदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत किशोरी पेडणेकर सहभागी झाल्या होत्या. त्याचसोबत भाजपाचे नगरसेवक आकाश पुरोहित हे दोघेही समोर आले आहे. यामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे.