मुंबई - अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Mumbai Anti Drug Team) मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे ड्रग जप्त केले आहे. गुरुवारी (24 मार्च) रात्री 10 च्या जवळपास आजाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंगरी येथे कारवाई करत, 3 किलो 110 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त (Drug Seized in Dongri Area) केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 4 कोटी 68 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. आरोपी आशिकअली पोयसरवाला याला अटक करण्यात आली आहे.
Drug Seized in Mumbai : अंमली पदार्थ विरोधी पथकाचे डोंगरी भागात मोठी कारवाई; 4 कोटी 68 लाखांचे ड्रग जप्त - डोंगरी भागात ड्रग जप्त
आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (Anti Drugs Team Mumbai) डोंगरी परिसरात मोठी कारवाई केली आहे. यात तीन किलो 110 ग्राम MD ड्रग जप्त (Drug seized in Mumbai) केले आहे. याची एकूम किंमत 4 कोटी 68 लाख रुपये एवढी आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. एनडीपीएस कायदेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर्षातली अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई : डोंगरी परिसरातून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज इतरत्र पुरवठा होत असल्याची माहिती आझाद मैदान पोलिसांना मिळाली होती. आशिकअली पोयसरवाला हा एमडीचा मोठा सप्लायर असल्याचे कळताच, पोलिसांनी त्याच्यावर वॉच ठेवला होता. आशिकअली एमडी विकण्यासाठी भायखळ्याच्या क्लेअर रोड परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास येणार असल्याची खबर मिळताच, प्रभारी निरीक्षक राजेंद्र दहिफळे, उपनिरीक्षक मानसिंग काळे, अभिजित पाटील, अमित देवकर व पथकाने त्याठिकाणी सापळा रचला. आशिकअली त्या ठिकाणी येताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्याकडे 705 ग्रॅम एमडीचा साठा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या डोंगरी येथील घराची झडती घेतली असता तेथे दोन किलो 405 ग्रॅम एमडीचा साठा सापडला. अशाप्रकारे पोलिसांनी आशिकअलीकडून तब्बल 4 कोटी 66 लाख 50 हजार किंमतीचा एमडीचा साठा हस्तगत केला. यावर्षातली अंमली पदार्थ विरोधी कक्षाची ही मोठी कारवाई आहे.