मुंबईवरळी मतदारसंघ हा शिवसेना नेते आदित्य ठाकरे Aaditya Thackeray Worli Assembly constituency यांचा मतदारसंघ आहे. मात्र याच मतदारसंघात असलेल्या वरळीच्या मैदानातून भाजपाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya in Worli Dahi Handi यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. वरळी येथील जांबोरी मैदानात भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन Worli Dahi Handi 2022 करण्यात आले होते. या आयोजनाला किरीट सोमय्या यांनीही हजेरी लावली. यावेळी दहीहंडी उत्सवाच्या मंचावर शिवसेनेला आव्हान दिले आहे Kirit Somaiya criticized shivsena.
कॉन्ट्रॅक्टर माफियाला खाली घेतले जाईलमुंबई महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर माफिया आहे. या कॉन्ट्रॅक्टर माफिया दहीहंडी फोडल्याशिवाय किरीट सोमय्या गप्प बसणार नाही असा इशारा या मंचावरून शिवसेनेला दिला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना भ्रष्टाचारी सरकारला खाली करण्याचे काम झालं. आता होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कॉन्ट्रॅक्टर माफियाला खाली घेतले जाईल, असा इशारा सौमय्या यांनी दिला.