मुंबई -नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून एका बाजूला बॉलीवूड आणि सेलिब्रीटी यांची धरपकड सुरू असताना दुसरीकडे पोलिसांनी मुंबईची ड्रग्स सफाई सुरु केली आहे. धूम्रपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण खर तर धूम्रपान संपूर्ण मानवजातीसाठी हानिकारक आहे. जीवनातील वाढत्या समस्यांसोबत तंबाखूचा वापर वाढत आहे आणि तो फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही तंबाखूमुळे आपल्या पृथ्वी मातेलाही धोका आहे. 31 मे म्हणजे जागतिक तंबाखू विरोधी दिन ( World No Tobacco Day ) हा एक असा दिवस आहे, जो दर वर्षी आपल्याला तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या धोकादायक बदलांची आठवण करून देतो. त्याचप्रमाणे आता युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढल्याचे ( Addiction rate among youth increased ) दिसून येत आहे. मुंबई पोलीस आणि एनसीबीकडून ( Mumbai Police and NCB ) मुंबईत यावर्षी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवाया करणाऱ्या ड्रग्स विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तंबाखूमुळे भारतात होणारे मृत्यू दरवर्षी सुमारे 13 लाख इतके असल्याचा अंदाज आहे.
दरवर्षी 13 लाख जणांचा मृत्यू :तंबाखूच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी सुमारे 80 लाख व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू होतात. भारत हा तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. तंबाखूमुळे भारतात होणारे मृत्यू दरवर्षी सुमारे 13 लाख इतके असल्याचा अंदाज आहे. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे महिलांच्या तुलनेत पुरुष मंडळी अधिक प्रमाणात सेवन करतात. परंतु मुंबईतील किशोरवयीन मुलींमध्येही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. कुर्ला पश्चिम येथील नशाबंदी मंडळातर्फे काही दिवसांपूर्वी तंबाखू आणि तंबाखूजन्य काही पदार्थांच्या सेवनाबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 10 ते 20 या किशोरवयीन मुलींच्या गटात तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे एकूण प्रमाण 7 टक्के असल्याचे उघड झाले. 10 ते 40 वयोगटाच्या महिला व मुली यांचा आठ दिवसांचा एकूण 100 कुटुंबांचा एक नमुना सर्व्हे करण्यात आला. यादरम्यान महिलांमध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळले. 20 ते 30 आणि 30 वर्षांपुढील महिला दररोज तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. महिला आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर असून यावर तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
27 कोटींचे अमली पदार्थ हस्तगत :मुंबई पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने चालू वर्षात पहिल्या आठ महिन्यांत तब्बल 3 हजार 575 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 87 कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. अमली पदार्थ तस्करीची साखळी तोडण्यासाठी ड्रग्ज पुरवठादारांपासून ते व्यसन करण्यापर्यंत सर्व पातळीवरील आरोपींना पकडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. मुंबई पोलीस, गुन्हे शाखा तसेच अमली पदार्थविरोधी पथकाच्या वतीने मुंबईत ड्रग्सची तस्करी विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. त्यातच मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून गरिबांपासून उच्च वर्गीयांपर्यंत सर्व स्तरातील लोकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे ड्रग्स तस्करांचा या शहराकडे अधिक ओढा असतो. मुंबईत बस, रेल्वे, समुद्र अशा वेगवेगळ्या मार्गांनी अमली पदार्थ आणले जातात. तरुण पिढी या ड्रग्सच्या आहारी जात असून ड्रग्स तस्कर अमली पदार्थांच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमवितात. हे सर्व थांबविण्यासाठी तसेच अमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. चालू वर्षात अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग संदर्भात 88 गुन्हे दखल केले असून 129 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून सुमारे 60 कोटी रुपयांचे ड्रग हस्तगत करण्यात आले आहे. दुसरीकडे, मुंबईत 94 पोलिस ठाणी असून या सर्व पोलिसांनी या वर्षी पहिल्या आठ महिन्यात 3 हजार 245 गुन्हे दाखल करून 3 हजार 446 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे 27 कोटींचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
एनसीबीची धडक कारवाई :अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभाग सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात एनसीबीने जवळपास 300 अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तब्बल 300 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ पकडले असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. यामध्ये 30 किलो चरस, 12 किलो हेरॉईन, 350 किलो गांजा आणि 25 किलो एमडी औषध जप्त करण्यात आल्याचीही माहिती एनसीबीने दिली. मुंबईत अमलीपदार्थ तस्कारांचे मोठे नेटवर्क पसरल्याचे गेल्या काही दिवसातील कारवायांवरून समोर आले आहे. या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून छापेमारी करत कारयावा करण्यात येत आहेत. विदेशातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी होत असल्याचेही पोलिसांच्या कारवाईत स्पष्ट होत आहे. दरम्यान अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडचे देखील अमलीपदार्थ तस्करांशी संबंध असल्याचे समोर आले होते.
हेही वाचा -Sanjay Raut on supriya sule : सर्व नेते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश, तेच पुढची पंचवीस वर्षे मुख्यमंत्री - संजय राऊत