मुंबई - ३0 मे म्हणजे जागतिक तंबाखू विरोधी दिन ( World No Tobacco Day 2022 ) म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी मुंबई मंत्रालयाच्या प्रांगणात जनजागृती करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम ( Adverse effects of tobacco use ) सांगण्यात आले आणि याच्या एक पाऊल पुढे जात मुंबई बेस्ट प्रशासनाने एक बहुपयोगी पदार्थ तयार केला आहे. ज्याचे नाव मेजिक मिक्स असे आहे. जे तंबाखूसारखे दिसते पण घरगुती मसाल्यापासून बनवले जाते, ज्यामुळे कर्करोगाचा धोकाही राहणार नाही, तसेच थुंकल्याने प्रदूषणही होणार नाही. असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
World No Tobacco Day 2022 : तंबाखूपासून मुक्त होण्यासाठी आता मॅजिक मिक्स - जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022
मुंबई मंत्रालयाच्या प्रांगणात जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्ताने ( World No Tobacco Day 2022 ) जनजागृती करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम ( Adverse effects of tobacco use ) सांगण्यात आले आणि याच्या एक पाऊल पुढे जात मुंबई बेस्ट प्रशासनाने एक बहुपयोगी पदार्थ तयार केला आहे. ज्याचे नाव मेजिक मिक्स असे आहे.
तंबाखूपासून मुक्त होण्यासाठी आता मॅजिक मिक्स
31 मे म्हणजे जागतिक तंबाखू विरोधी दिन ( World No Tobacco Day ) हा एक असा दिवस आहे, जो दर वर्षी आपल्याला तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या धोकादायक बदलांची आठवण करून देतो. त्याचप्रमाणे आता युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढल्याचे ( Addiction rate among youth increased ) दिसून येत आहे.