नवी मुंबई -जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधत शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेतर्फे बेलापूर महापालिका मुख्यालयापासून ते नवी मुंबई शहरापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली होती. यात सायकल चालविण्याचे फायदे सांगत जनजागृतीही करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सायकल चालविणे किती महत्वाचे आहे, याची देखील माहिती सांगण्यात आली आहे.
फिटनेस टिकण्यासाठी सायकल चालविणे गरजेचे
कोरोनाच्या महामारीत कोरोनापासून बचाव करताना आपले आरोग्य टिकून राहण्यासाठी 'सायकल चालवा शहर वाचवा' असा संदेश देण्यात येत आहे. नवी मुंबईतील शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेतर्फे सायकल चालविण्याविषयी अधिक जणजागृती व्हावी, तसेच पर्यावरण शुध्द राहावे यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.