मुंबई -केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ लालबाग येथील भारतमाता सिग्नल येथे केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने निर्दशने करण्यात आली. सरकार जोपर्यंत कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
Workers Agitation Mumbai : केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधात लालबागमध्ये निर्दशने - मुंबईत कामगारांचा निषेध आंदोलन
केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधात शासकीय, निम शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. दोन दिवसांचा संप असून महाराष्ट्रातील विविध संघटनांनी संपला पाठिंबा दिला आहे. आज लालबाग येथील भारतमाता सिनेमागृह सिग्नल परिसरात केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधात शासकीय, निम शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. दोन दिवसांचा संप असून महाराष्ट्रातील विविध संघटनांनी संपला पाठिंबा दिला आहे. आज लालबाग येथील भारतमाता सिनेमागृह सिग्नल परिसरात केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करा, कामगार कायद्यातील बदल हाणून पाडा, एनटिसीच्या सर्व मिल पुन्हा सुरू करा, कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करा, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबलेच पाहिजे, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. कृती समितीत विविध संघटनाचे पदाधिकारी आणि आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.