महाराष्ट्र

maharashtra

'बीडीडी' चाळींच्या पुनर्विकास कामाला लवकरच सुरुवात - मधू चव्हाण

By

Published : Nov 14, 2019, 12:16 PM IST

बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार नसल्याने स्थलांतरण थांबवण्याबाबत बीडीडी चाळ पुनर्विकास समितीने दिलेल्या निवेदनावरून म्हाडा व उपजिल्हाधिकारी विभाग यांची म्हाडा मुख्यालयात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

बीडीडी चाळ

मुंबई - ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली. तसेच उर्वरित भाडेकरूंची पात्रता निश्चिती १० दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश चव्हाण यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा -घाटकोपरचे माणिकलाल मैदान वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात

बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार नसल्याने स्थलांतरण थांबवण्याबाबत बीडीडी चाळ पुनर्विकास समितीने दिलेल्या निवेदनावरून म्हाडा व उपजिल्हाधिकारी विभाग यांची म्हाडा मुख्यालयात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांनी हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने सर्व लाभार्थ्यांची पात्रता प्रसिद्ध झाल्यानंतर व त्यांच्या समवेत करारनामा करण्यात येईल. अश्या १० चाळी, ८० दुकाने/झोपड्या व ५ मंदिरे यांचे स्थलांतरण करून रिक्त बांधकामे तोडल्यानंतर तांत्रिकद्रुष्टया प्रत्यक्ष जागेवर पुनर्विसन इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे समितीला सांगितले. तसेच ज्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात घरे दिली आहेत आणि ते स्थलांतर करण्यास अडथळे निर्माण करत आहेत त्यांच्यावर म्हाडा कायदा ९५ (ए) नुसार निष्कासनाची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details