महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Highest Bridge In The Country : १३२ मीटर उंचीच्या देशातील सर्वांत उंच पुलाचं काम प्रगतीपथावर - infrastructure

भारतातील सर्वात उंच केबल स्टेड ब्रीज (Cable Steady Bridge) राज्यात बांधण्यात येत असून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर हा पूल बांधला जात आहे. या 132 मीटर उंच पुलाचे (132 meters bridge) बांधकाम सध्या वेगाने सुरू असून केबल स्टेड पुलाची लांबी जवळपास 650 मीटर लांब असणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीच्या अफकॉन्स कंपनीला हे काम देण्यात आले असल्याची माहिती अफकॉन्स कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक रणजीत झा यांनी दिली आहे.

Highest Bridge In The Country
देशातील सर्वांत उंच पुलाचं काम प्रगतीपथावर

By

Published : Oct 3, 2022, 3:54 PM IST

मुंबई :मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये सध्याच्या द्रुतगती मार्गाचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. शिवाय या मार्गावर नव्याने दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. त्यापैकी एका ब्रीजमध्ये केबल-स्टेड ब्रिजसह इतर कामांचा समावेश आहे. यातील सुमारे 850 मीटर लांबीच्या व्हायाडक्ट-१ साठी फाउंडेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर प्री-टेन्शन गर्डर्स आणि डेक पॅनेलचे लॉन्चिंग सुरू आहे.

देशातील सर्वांत उंच केबल स्टेड पूल (highest cable stayed bridge in the country) केबल-स्टेड पुलाची लांबी जवळपास 650 मीटर लांब आहे. तर हा पूल जमिनीपासून 132 मीटर उंचीवर असेल. जो देशातील इतर रस्ते प्रकल्पामधील सर्वात उंच पूल असणार आहे. या केबल स्टेड रोड ब्रीजमुळे मुंबई-पुणे या दोन शहरांमधील अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घाट विभागाला बायपास करेल. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गाची खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतची लांबी 19 किलोमीटर आहे. या ब्रीजचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवास जवळपास 25 मिनिटांनी कमी होणार असल्याचा दावा अफकॉन्स कंपनीचे (Afcons Company) प्रकल्प व्यवस्थापक रणजीत झा (Project Manager Ranjit Jha) यांनी केला आहे.

महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होणार-सध्या व्हायाडक्ट दोनमध्ये फाउंडेशन, पिलर आणि पायलॉन (केबल स्टेड ब्रीज पिलर) बांधण्याचे काम सुरू आहे. या व्हायाडक्टमधील सर्वात उंच पायलॉन जमिनीच्या पातळीपासून 182 मीटर प्रस्तावित आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा दावाही रणजीत झा यांनी केला आहे. खंडाळा घाट हा भूस्खलन आणि अपघातप्रवण भाग आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पॅकेज टूचे काम 2019 मध्ये सुरू झाले असून हे काम 2024 मध्ये पूर्ण होईल, असेही झा यांनी सांगितले. नवीन लिंकमुळे अपघात कमी होण्यासोबतच इंधन कार्यक्षमता सुधारण्यास आणि वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे.

पूल उभारणीत काय आहेत आव्हाने ?मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर उभारल्या जाणाऱ्या भारतातील सर्वात उंच केबल स्टेड ब्रीज पूलाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी विविध भूवैज्ञानिक, वाहतूक आणि अत्यंत अभियांत्रिकी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सध्याच्या एक्स्प्रेस वेचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये टेकडी तोडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details