मुंबई - दिशा सालियन ( Disha Salian Case ) हीच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. याबाबत 48 तासात मालवणी पोलिसांनी आपला अहवाल सादर करावा, असे आदेश आता महिला आयोगाकडून देण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांनी दिशा सालियन यांची मृत्युनंतरही बदनामी केली जात असल्याची तक्रार थेट महिला आयोगाकडे ( Complaint to Women's Commission ) केली. त्या तक्रारीबाबत महिला आयोगाने तत्परता दाखवत थेट पोलिसांना 48 तासात याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
याआधी दिशा सालियन यांच्या शवविच्छेदन अहवालात कोणताही बलात्कार झाला नव्हता. तसेच त्या गरोदर नसल्याचे अहवालात म्हटले गेले होते. हा अहवाल त्यांच्या आई-वडिलांना देखील मान्य होता. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिसा सालियन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्याचा खळबळजनक आरोप केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे आपल्या तक्रार पत्रातून किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाकडे केली आहे. तसेच दिशा सालियन यांची बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रातून किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात महिला आयोगाने दिला पोलिसांना 'हा' आदेश
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांनी दिशा सालियन यांची मृत्युनंतरही बदनामी केली जात असल्याची तक्रार थेट महिला आयोगाकडे ( Complaint to Women's Commission ) केली. त्या तक्रारीबाबत महिला आयोगाने तत्परता दाखवत थेट पोलिसांना 48 तासात याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
संग्रहित छायाचित्र
Last Updated : Feb 21, 2022, 9:06 PM IST
TAGGED:
Disha Salian Case