महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Neelam Gorhe on Shakti Law : शक्ती कायद्यात महिलांना मिळणार न्याय; दोषींवरही लवकरच कारवाईची तरतूद - नीलम गोऱ्हे शक्ती कायदा

आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, महिलांचे मदत व पुनर्वसन वेळेत व्हावे, त्याबरोबर सायबर हल्ला आणि अॅसिड हल्ल्याबाबत कारवाई करण्याची तरतूद आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात (Assembly Winter Session) शक्ती कायदा (Shakti Law Update) मांडण्यात आला आहे.

Neelam Gorhe
Neelam Gorhe

By

Published : Dec 23, 2021, 6:52 AM IST

मुंबई - राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात (Assembly Winter Session) शक्ती कायदा (Shakti Law Update) मांडण्यात आला आहे. याअंतर्गत महिलांना न्याय मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने होणारी असून दोषींवर लवकरच कारवाई तरतूद असेल, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe on Shakti Law) यांनी दिली. विधानभवानाबाहेर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

समितीचा मसुदा तयार
राज्यात होणाऱ्या महिलांवरील अत्याचार, बलात्कार सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्यानुसार हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा मांडण्यात येणार असून त्यावर अधिवेशनात दोन्ही सभागृहात चर्चा केली जाईल. यापूर्वी ज्या सगळ्या बैठका झाल्या त्यामध्ये विधेयके आणि काय काम करायचे याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सल्लामसलत करण्यात आली. तसेच शक्ती विधेयकासाठी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सदस्यांची संयुक्त चिकित्सा समिती नेमली होती. त्या समितीचा मसुदा अंतिम केला आहे. विधीमंडळाच्या पटलावर तो ठेवण्यात येणार आहे, असे उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले.

केंद्राने मंजूरी द्यावी
आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, महिलांचे मदत व पुनर्वसन वेळेत व्हावे, त्याबरोबर सायबर हल्ला आणि अॅसिड हल्ल्याबाबत कारवाई करण्याची तरतूद आहे. या संदर्भातील निर्णय विधेयकामध्ये समाविष्ट केला आहे. सर्वांच्या सहकार्याने लवकर हे विधेयक मंजूर होईल. केंद्र सरकारने देखील महत्वाच्या विधेयकाला लवकर परवानगी द्यावी, असे गोऱ्हे म्हणाल्या.
हेही वाचा -Assembly Winter Session : प्रथा बदलण्याचा अट्टाहास का.. 170 च्या बहुमतावर सरकारला विश्वास नाही का? फडणवीस यांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details