मुंबई - मूळच्या रशियन असलेल्या महिलेने गेली 12 वर्षे आपल्यावर एक पोलीस अधिकारी बलात्कार करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच या अधिकाऱ्याने वारंवार गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याचेही संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने हा पोलीस अधिकारी बलात्कार करत असल्याचा आरोप तिने केला. यासंबंधी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. अनिल उर्फ भानुदास जाधव असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने रशियन महिलेवर पोलिसाचा सतत 12 वर्षे बलात्कार - मुंबई बलात्कार
मूळच्या रशियन असलेल्या महिलेने गेली 12 वर्षे आपल्यावर एक पोलीस अधिकारी बलात्कार करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच या अधिकाऱ्याने वारंवार गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याचेही संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
38 वर्षांची रशियन तरुणी डिसेंबर 2003 मध्ये भारतात 6 महिन्यांच्या व्हिसावर आली होती. हा व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने अनिल जाधव या पोलीस अधिकाऱ्याची तिची ओळख झाली. यानंतर त्याने गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केला असून, मुलासहीत आपल्याला देखील मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने जबाबात म्हटले.
तसेच जाधव याने एक तरुणीचा आणि तिच्या भावाचा खून आपल्या समक्ष केला असून, त्याला पुण्यात एका ठिकाणी गाडल्याचे फिर्यादीने सांगितले. या प्रकरणी तिचे वकील नितीन सातपुते यांनी माध्यमांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देत कडक कारवाईची मागणी केली आहे.