महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Update : सॅंडलमधून कोकेनची तस्करी... महिला प्रवाशाला मुंबई विमानतळावर अटक - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

मुंबई विमानतळावर ( Mumbai Airport ) या महिलेची झडती घेतली असता कोकेन ( Smuggling of cocaine ) सापडले. महिला मुंबईत हे ड्रग्ज नेमके कोणाला विकणार होती, याचा अधिक तपास केला जात आहे.

Smuggling of cocaine
कोकेनची स्मगलिंग

By

Published : Oct 2, 2022, 9:51 AM IST

Updated : Oct 2, 2022, 11:24 AM IST

मुंबई : मुंबई विमानतळावर ( Mumbai Airport ) या महिलेची झडती घेतली असता कोकेन ( Smuggling of cocaine ) सापडले. या 490 ग्रॅम कोकेनेची किंमत जवळपास 4.9 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कधी शेवग्याच्या शेंगा, कधी बेल्ट तर कधी पोटातून ड्रग्ज तस्करी केल्याच्या अनेक घटना घडल्या. आता ड्रग्ज महिलेने सँडलमध्ये लपवले होते. महिलेला अटक करुन तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. महिला मुंबईत हे ड्रग्ज नेमके कोणाला विकणार होती, याचा अधिक तपास केला जात आहे. अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी गुन्हेगार नेहमीच विविध शक्कल ( Heroine smuggling case ) लढवितात.

4.9 किलो हेरॉइन ड्रग्ज : काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) आई आणि मुलीकडून 25 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. दोघीही दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गच्या रहिवासी आहेत आणि कतारमधील दोहामार्गे त्या मुंबईला आल्या होत्या. विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाच्या पथकाने हे ड्रग्ज एका सूटकेसच्या आतील कप्प्यातून जप्त केले होते. या दोघीही मुंबईला फिरण्यासाठी आणि उपचार घेण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. कस्टम विभागाच्या मते, सूटकेसमध्ये एक विशेष पोकळी बनवून 4.9 किलो हेरॉइन ड्रग्ज काळ्या रंगाच्या पॅकेटमध्ये काळजीपूर्वक लपवून ठेवण्यात आले होते. मुंबई विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने दोघांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली.

मुंबई विमानतळावर या आधीही असे घडले : गेल्या महिन्यात मुंबई विमानतळावर पोटात अमली पदार्थाच्या 80 कॅप्सूल लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 27 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. सदर महिला व्हेनेझुएलाची नागरिक आहे. ही महिला 9 ऑगस्ट रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर साऊ पावलो येथून आली होती. तिच्या सामानाची झडती घेताना महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने विमानतळावरील डीआरआयने सदर महिलेला ताब्यात घेतले.

Last Updated : Oct 2, 2022, 11:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details