महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

घाटकोपरमध्ये गटारीचे झाकण उघडे, महिला पडून वाहून गेल्याचा संशय - मुंबई घाटकोपर पावसाने गटारी फूल बातमी

शीतलच्या हातातील पिशवी त्याच ठिकाणी पडल्याने तर्कवितर्क लावले जात आहे. यामुळे आज सकाळ पासून या ठिकाणी अग्निशमन दल, पालिका आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आज सायंकाळी उशीरा पर्यंत शोध कार्य सुरू असून अद्यापही या महिलेबाबत माहीती मिळू शकली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

women missing in gutter at ghatkopar in mumbai
घाटकोपरमध्ये गटारीचे झाकण उघडे, महिला पडून वाहून गेल्याचा संशय

By

Published : Oct 4, 2020, 7:13 PM IST

Updated : Oct 4, 2020, 7:38 PM IST

मुंबई -महानगरात काल (शनिवारी) झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपरमध्ये एक महिला गटारावरील झाकण उघडे असल्याने त्यात पडून वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शीतल जितेश भानूशाली असे या 32 वर्षीय महिलेचे नाव आहे.

घाटकोपरमध्ये गटारीचे झाकण उघडे, महिला पडून वाहून गेल्याचा संशय

शीतल या काल (शनिवारी) चक्कीवर दळण घेऊन गेल्या होत्या. त्या घरी परतत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला आणि रस्त्यात पाणी भरू लागले. या वेळी त्यांनी दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या गल्लीत गटराचे झाकण उघडे राहिल्याने ते त्यात पडून वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण शीतलच्या हातातील पिशवी त्याच ठिकाणी पडल्याने तर्कवितर्क लावले जात आहे. यामुळे आज सकाळपासून या ठिकाणी अग्निशमन दल, पालिका आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आज सायंकाळी उशीरा पर्यंत शोध कार्य सुरू असून अद्यापही या महिलेबाबत माहिती मिळू शकली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Last Updated : Oct 4, 2020, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details