वांद्रे (मुंबई) - गाजीपूर (19041 Down) कोविड स्पेशल ट्रेनच्या शौचालयात महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली. गुडिया विश्वकर्मा असे बाळाला जन्म देणाऱ्या आईचे नाव असून बाळाला जन्म दिल्यानंतर पालघर रेल्वे स्थानकात ही रेल्वे थांबविण्यात आली. येथील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी रेल्वेच्या शौचालयात बाळाला जन्म दिलेल्या महिलेची प्रसुतीनंतरची प्रक्रिया पूर्ण केली. तिला पालघर येथील कांता रुग्णालय व प्रसूतिगृह येथे दाखल करण्यात आले. महिला व बाळाची प्रकृती चांगली असून त्यांना दोघांनाही दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वांद्रे-मुंबई ट्रेनच्या शौचालयात बाळाचा जन्म धावत्या ट्रेनच्या शौचालयामध्ये महिलेने दिला बाळाला जन्म हेही वाचा -आयआयटी मुंबईचे 'बंधू' देणार विद्यार्थ्यांना मानसिक पाठबळ
अशा प्रकारे महिलेने दिला रेल्वेच्या शौचालयात बाळाला जन्म -
नालासोपारा येथील रहिवासी असलेले राजेश विश्वकर्मा व त्यांची गर्भवती पत्नी गुडिया हे दोघे (19041 Down) वांद्रे-गाजीपूर या कोविड विशेष ट्रेनमधून उत्तर प्रदेश येथील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. वांद्रे येथून गाडी सुटल्यानंतर विरार स्थानकाच्या आसपास या महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या व थेट तिने शौचालयाकडे धाव घेतली. शौचालयांमध्ये जाऊन तिने बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिची या शौचालयातच अर्धवट प्रसूती झाली. ही बाब तिच्या पतीला कळताच त्यांनी रेल्वेच्या टीटीईला ही माहिती दिली. पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही बाब कळविल्यानंतर या ट्रेनला पालघर येथे थांबा देण्याचे निश्चित करण्यात आले. पालघर रेल्वे स्थानक प्रशासनाने ट्रेन पालघर स्थानकात पोहोचण्याआधीच बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र चव्हाण यांना पाचारण केले.
वांद्रे-मुंबई ट्रेनच्या शौचालयात बाळाचा जन्म दरम्यान, पालघर रेल्वे स्थानकात ही एक्सप्रेस ट्रेन (सोमवारी) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अनियोजित थांबविण्यात आली. ट्रेन पालघर स्थानकात पोहोचताच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चव्हाण आपल्या एका कर्मचाऱ्यासह ट्रेनच्या शौचालयात पोहोचले. तेथे गुडिया विश्वकर्मा यांची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करत महिलेसह बाळाला कांता प्रसूती रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या महिला व बाळाची प्रकृती चांगली असून त्यांना दोघांनाही दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी औदार्य दाखवत या महिलेकडून उपचारांसाठी एकही रुपया घेतलेला नाही. लॉकडाऊनदरम्यान ट्रेनमध्ये प्रसूती झाल्याचा हा पहिलाच प्रसंग असावा.
हेही वाचा -मास्क नाही तर प्रवेश नाही : कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची मोहीम आता राज्यभरात