महिलांना लहान मुलांसोबत लोकल प्रवासास बंदी; रेल्वे पोलीस ठेवणार निगराणी - लहान मुलांसह महिलांचा लोकल प्रवास
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही, त्यातच लोकल गाड्यांची संख्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच महिलांना देखील लोकल प्रवासाची मुभा दिला आहे. मात्र, काही महिला आपल्या लहान मुंलांना सोबत घेऊन लोकलने प्रवास करत असल्याचे समोर आल्याने रेल्वेकडून अशा प्रवाशांना मज्जाव करण्यात आला आहे.
मुंबई – अनलॉक अंतर्गत राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी महिलांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली. मात्र, महिलाप्रवासी लोकलमधून आपल्या लहान मुलांना घेऊन प्रवास करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आता महिलांसोबत लहान मुलांना लोकल प्रवासाची परवानगी नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून खडसाविण्यात आले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्याने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती. मग 17 ऑक्टोबरपासून महिलांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली. सर्व महिलांना सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येत आहे. मात्र अनेक महिला या आपल्या लहान मुलांसोबत लोकलमधून प्रवास करतात, ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. त्यामुळे आता लहान मूलसोबत घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्या्त आले आहे.
रेल्वेच्या माहितीनुसार आता मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या गेटवर एक आरसीएफ जवान तैनात करण्यात आला आहे. हे जवान महिलांसोबत लहान मुल आढळल्यास तिला रेल्वे स्थानकातून माघारी पाठविणार आहेत.