मुंबई -गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात उष्णता ( Heat Wave Increase In Mumbai ) वाढली आहे. त्यामुळे उन्हाळाच्या चटकेपासून बचावासाठी वातानुकूलित वाहनाचा आसरा मुंबईकर घेत आहे. मात्र, ओला-उबेर ( Ola Uber Cab ) चालकांकडून मुंबईकरांची लूट होताना दिसून येत आहे. उबेरमध्ये एसी लावयाचा असेल, तर प्रवाशांना अतिरिक्त शुल्क ( Ola Uber Extra Charge For AC ) द्यावे लागणार आहे. याबाबद एका महिला प्रवाशांने तक्रार सुद्धा कंपनीकडे केली आहे.
हैदराबादमध्ये 'NO AC' मोहीम -अँप बेस्ट टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या ओला आणि उबेरचा टॅक्सी पुन्हा एकदा वादाचा भोऱ्यात अडकली आहे. ओला-उबेर टॅक्सी चालकांना वाढत्या इंधन दरवाढीमुळे मोठे नुकसान होत आहे. त्यातच आता भर उन्हाळ्यात प्रवाशांना एसी सेवा जुन्या भाड्याप्रमाणे देणे शक्य नाही. त्यामुळे एसी सेवेसाठी प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे ओला-उबेर चालकांकडून उकळण्याची सुरुवात केली आहे. याबाबत अनेक तक्रारी प्रवाशांनी कंपनीकडे केल्या आहे. हैदराबादमध्ये उद्यापासून 'NO AC' मोहीम राबवली जाणार आहे. सोबतच भाडेवाढीसाठी आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे. सध्या तेलंगणामध्ये डिझेलचा दर ९८. १० प्रति लिटर परिवहन विभागाने पाऊल उचलणे आवश्यक आहे. सध्या, प्रति किमी १२ ते १३ रुपये पेक्षा कमी आहे. चालकांना एसी चालू करण्यासाठी किमान २४-२५ प्रति किमी हवे आहे.