महाराष्ट्र

maharashtra

मुंबई : सुरक्षितता राखत महिलांचा लोकल प्रवास सुरू

By

Published : Oct 21, 2020, 1:27 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलच्या प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, मुंबई उपनगरी रेल्वे वाहतूक आता महिलांसाठीही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी मुंबईतील दादर रेल्वेस्थानकावरील महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत..

women-allowed-to-travel-in-local-train-of-mumbai-from-today
मुंबई : सुरक्षितता राखत महिलांचा लोकल प्रवास सुरू

मुंबई - मुंबईतील लोकलमध्ये आजपासून महिलांना प्रवास करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलच्या प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, मुंबई उपनगरी रेल्वे वाहतूक आता महिलांसाठीही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी मुंबईतील दादर रेल्वेस्थानकावरील महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत..

मुंबई : सुरक्षितता राखत महिलांचा लोकल प्रवास सुरू

राज्य शासनाने रेल्वेला 17 ऑक्टोबरपासून सर्व महिला प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये चढण्यास परवानगी देण्यास सांगितले होते. मात्र, यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. या विषयावर गेल्या दोन दिवसांपासून अनेक बैठका सुरू होत्या. यानंतर काल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अखेर महिलांना लोकल ट्रेनमधील प्रवासासाठी हिरवा कंदिल दाखवला.

'मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान आणि सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरी रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, अशा आशयाचे ट्विट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details