मुंबई :आज पर्यंत पौरोहित्य करणारे तुम्ही अनेक पुरुष गुरुजी पाहिले असतील आणि तुम्ही कधी पौरोहित्य करणाऱ्या महिला पहिल्यात का ? अर्थातच नाही. पण, अशा अनेक महिला पौरोहित्य करत आहेत. मुंबईतील शमिका बाईत या त्यापैकीच एक. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी शमिका बाईत यांच्याशी खास बातचीत केली.
केमिकल इंजिनिअर ते पौरोहित्य
बीएससी केमिकल इंजिनिअरिंग केलेल्या शमिका बाईत एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर व चांगल्या पगाराची नोकरी करत होत्या. मात्र, काम खूप असल्याने तिथल्या केमिकलचा त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ लागला त्यांना पाठीचे दुखणे सुरू झाले. सततच्या आजारपणाला कंटाळून शमिका यांनी आपला राजीनामा दिला व घरकाम करू लागल्या.
पौरोहित्याचा 10 वर्षाचा अनुभव
पौरोहित्य सुरू करून आता शमिका यांना दहा वर्ष झाली आहेत. या दहा वर्षात त्यांना विविध अनुभव आले शमिका सांगतात "सुरूवातीला लोकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. पण, आम्ही करत असलेले मंत्र उच्चार व आमची पूजा सांगण्याची पद्धत बघून लोकांना प्रसन्न वाटू लागल. मग, हळूहळू लोक आम्हाला संपर्क करू लागली व आमचा पूजेच्या आवाका देखील वाढत गेला."
लोकांचा विरोध
"आम्ही पुरुष गुरुजीच बोलावतो. त्यांना महिलांनी पूजा सांगितलेलं आवडायचं नाही. असेही सांगणारी काही घर मिळाली. अशी काही लोक अजूनही आहेत. पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. ज्या लोकांना माहिती आहे आम्ही पूजा सांगतो आणि ज्या लोकांना आम्ही सांगितलेली पूजा आवडते. ती लोक आम्हाला आवर्जून बोलवतात." असं शमिका सांगतात.
इतर महिलांनी देखील या क्षेत्राकडे वळावं
शमिका सांगतात "इतर इच्छुक महिलांनी देखील या क्षेत्राकडे वळावं. रोजगाराला वाव आहे. तुम्हाला काम केल्याचं समाधान मिळतं. मन प्रसन्न राहत व तुमचे शब्द उच्चार देखील स्पष्ट होतात. त्यामुळे इतर महिलांनी देखील या क्षेत्राकडे वळावं." असं शमिका सांगतात.
हेही वाचा -Women's Day Special 2022 : पानिपतमधील 'या' महिलेने समाजासमोर ठेवला आदर्श