महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rape News : पतीपासून विभक्त महिलेला ओढले प्रेमाच्या जाळ्यात अन् केला बलात्कार; दोघे अटकेत - Kolsevadi Police Station

लग्नाचे आमिष दाखवून दोन नराधमांनी बलात्कार ( Rape by luring marriage ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडित महिला गरोदर ( victim pregnant ) राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ( Kolsevadi Police Station ) दोघा नराधमाविरोधात अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल

Rape By Luring Marriage
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By

Published : Aug 4, 2022, 5:28 PM IST

ठाणे :पतीपासून विभक्त झालेल्या एका ३० वर्षीय महिलेच्या एकटपणाचा फायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून दोन नराधमांनी बलात्कार ( Rape by luring marriage) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडित महिला गरोदर ( victim pregnant ) राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोघा नराधमाविरोधात अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. गुड्डू उर्फ सिध्देश भाटकर (वय ३०) राहुल देवराव बोरडकर (वय २८) असे अटक नरधमांची नावे आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

पीडितेशी ओळख वाढवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले -विशेष म्हणजे आरोपी गुड्डू उर्फ सिध्देश हा कल्याण पूर्वेतील एका राजकीय पक्षाच्या कार्यलयात कामाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० वर्षीय पीडित महिला कल्याण पश्चिम भागातील इंदिरा नगर परिसरात राहणारी आहे. तिचा पुण्यातील स्वारगेट भागात राहणाऱ्या एका तरुणाशी विवाह झाला होता. मात्र, काही घरगुती कारणावरून पीडित महिला २०२१ मध्ये कल्याणला पुन्हा आली. मात्र, घरी न जाता ती कल्याण रेल्वे स्थनाकातील चार नंबर फलाटावर एकटीच राहत होती. याचाच फायदा घेऊन काही महिन्यापूर्वी राजकीय पक्षाच्या कार्यलयात कामाला असलेला आरोपी गुड्डू उर्फ सिद्धेश याने पीडितेशी ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

हेही वाचा -MD Drug Seized In Palghar : पालघरमध्ये एएनसी पथकाची मोठी कारवाई; 1400 कोटी रुपयांचे 'मेफेड्रोन' केले जप्त

बळजबरीने बलात्कार -त्यानंतर लग्नाचे आमिष कल्याण पूर्वेतील स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर कुठेही या घटनेची वाचता केली तर, ठार मारण्याची धमकीही दिली.आरोपीच्या अत्याचाराने पीडिता गरोदर राहिल्याने लग्नासाठी तिने तगादा लावला होता. यामुळे आरोपी गुड्डू उर्फ सिद्धेश याने पीडिताचा पिच्छा सोडविण्यासाठी पीडितीची ओळख त्याचा मित्र असलेल्या आरोपी राहुलशी करून देऊन बेपत्ता झाला. त्यानंतर या दोघांमध्ये ओळख वाढल्यानंतर आरोपी राहुलनेही पीडितेवर त्याच्या घरात नेऊन बलात्कार केला. दुसरीकडे पीडिता गरोदर राहिल्यापासून आरोपी गुड्डू उर्फ सिद्धेश तीन - चार महिने पीडितेला भेटला नाही.

गुन्हा दाखल -त्यामुळे दोघांही फसगत करून बलात्कार केल्याने तिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर घडललेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३७६ (२)(एन) २३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दोन्ही आरोपीवर २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच दोघांचा शोध घेऊन त्यांना ३ ऑगस्ट रोजी अटक केली. आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि एम. डी. डोके करीत आहेत.

हेही वाचा -Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये हॉटेल रुममध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details