मुंबई- महिला सक्षमीकरणावर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दर तीन महिन्यांनी महिला सबलीकरणावर चर्चा होण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच महिला अत्याचारांशी निगडीत कायदे कडक करायला हवेत, असे ते म्हणाले.
'झाशीच्या राणीने बांगड्या घालूनच संघर्ष केला', पुरुषी मानसिकतेविरोधात आदित्य ठाकरेंचे वक्तव्य राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी बोलताना, लहान मुलांना स्पर्शज्ञान शिकवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. स्वतः पुढाकार घेऊन महिलांना स्व-रक्षण शिकवत असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. तसेच शाळेच्या अभ्यासक्रमात 'सेल्फ डिफेन्स' विषय अंतर्भूत करण्यास त्यांनी सांगितले.
हेही वाचा -चंदा कोचर यांना उच्च न्यायालयाचा दणका, बडतर्फी विरोधातील याचिका फेटाळली
महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. अनेकदा बांगड्या घातल्या आहेत, असे म्हणून पुरुषी मानसिकता प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जातो. हे चुकीचे आहे असून झाशीच्या राणीने देखील बांगड्या घालूनच संघर्ष केल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या संस्कृतीत स्रियांना आदराचे स्थान आहे. त्यांचे संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असून आतापर्यंत 45 हजार महिलांना स्वरक्षणाचे धडे दिले आहेत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.