महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'स्त्री ही काही वस्तू नाही की, समाजानं तिला कसंही वापरावं'

अभिनेत्री साक्षी मलिकने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले. ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या एका सिनेमात आपले छायाचित्र गैरप्रकारे आणि परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा आरोप साक्षी मलिकने केला होता.

'स्त्री ही काही वस्तू नाही की, समाजानं तिला कसंही वापरावं'
'स्त्री ही काही वस्तू नाही की, समाजानं तिला कसंही वापरावं'

By

Published : Mar 5, 2021, 9:01 AM IST

मुंबई : 'स्त्री ही काही वस्तू नाही की, समाजानं तिला कसंही वापरावं. दिवसेंदिवस समोर येणारे प्रकार भयंकर आहेत, हे थांबायला हवं' असं गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नोंदविले आहे. ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले.

ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या एका सिनेमातील वादग्रस्त दृश्य वगळण्याची हमी दिल्यानंतर तो चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यास न्यायालयाने मंजुरी दिली असली तरी हे प्रकरण संपलं असं निर्मात्यांनी समजू नये असंही न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. अभिनेत्री साक्षी मलिकने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले. ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या एका सिनेमात आपले छायाचित्र गैरप्रकारे आणि परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा आरोप साक्षी मलिकने केला होता. यावेळी सुनावणीदरम्यान तिच्या दाव्यात तथ्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने सिनेमातील सदरील दृश्य वगळल्याशिवाय कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करू नये असे आदेश दिले.

काय आहे प्रकरण?

ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या एका सिनेमात साक्षी मलिकचे फोटो वापरण्यात आले होते. यात साक्षी मलिक देहविक्रीय व्यवसाय करीत असल्याचा संदर्भ होता. ही बाब लक्षात आल्यानंतर साक्षीने वकिलांमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घेतल्याचे साक्षी मलिकने म्हटले होते.

हेही वाचा -दत्तक दिलेला मुलगा परत मिळविण्यासाठी जन्मदात्याची न्यायालयात धाव, याचिका फेटाळली

ABOUT THE AUTHOR

...view details