मुंबई - धनंजय मुंडे खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेला किला न्यायालयात ( Kila Court ) ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या महिलेने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्याकडे ५ कोटीची खंडणी मागितली होती. पोलिसांनी या महिलेला अटक करून किला कोर्टात हजर केले होते.
धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या महिलेला ३ दिवसांची पोलीस कोठडी, ५ कोटीची मागितली होती खंडणी
धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या महिलेला इंदौर येथून अटक ( Woman arrested for threatening Dhananjay Munde ) करण्यात आली होती. या महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितली ( ransom demanded to Dhananjay Munde ) होती. पोलिसांनी महिलेला अटक केल्यानंतर किला न्यायालयात ( Kila Court ) हजर केले होते. न्यायालयाने महिलेला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण -राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी रात्री मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल (Dhananjay Munde File Complaint against Woman ) केला होता. याप्रकरणी धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या महिलेला इंदौर येथून अटक करण्यात आली होती. या महिलेने फोनच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करु, अशी धमकी दिली होती. धनंजय मुंडे यांना मिळालेल्या या धमकीनंतर त्यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली होती.