मुंबई - मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका परदेशी महिलेकडून लाखोंचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे महिलेला थांबवून तिची तपासणी केली असता तिच्या पोटातून 214 ग्रॅम हेरॉईनचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमत १० लाख रुपये आहे.
दुबईतून लाखोंचे अमली पदार्थ आणणाऱ्या महिलेस अटक
महिला दुबईहून ड्रग्ज घेऊन येत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर दुबईहून आलेल्या त्या संशयित महिलेला थांबवून प्रथम तिच्या बॅगची झडती घेण्यात आली. मात्र डीआरआयला त्यातून काहीही मिळाले नाही. तिची तपासणी केली असता तिच्या पोटात ड्रग्जचे २० कॅप्सूल दिसून आली. डीआरआयने त्या कॅप्सूलची तपासणी केली असता ते हेरॉईनचे ड्रग्ज असल्याचे आढळून आले.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई -एक महिला दुबईहून ड्रग्ज घेऊन येत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर दुबईहून आलेल्या त्या संशयित महिलेला थांबवून प्रथम तिच्या बॅगची झडती घेण्यात आली. मात्र डीआरआयला त्यातून काहीही मिळाले नाही. तिची तपासणी केली असता तिच्या पोटात ड्रग्जचे २० कॅप्सूल दिसून आली. डीआरआयने त्या कॅप्सूलची तपासणी केली असता ते हेरॉईनचे ड्रग्ज असल्याचे आढळून आले. यानंतर या महिलेला अटक करण्यात आली असून तिची चौकशी करण्यात येत आहे. हे ड्रग्ज ती कोणाला आणि कुठे पुरवत होती, हे त्या महिलेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.