महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमली पदार्थांची तस्करी कराऱ्या महिलेला अटक, फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरवायची ड्रग्ज - मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांबाबत कारवाई

मालाड पूर्व कुरार पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. लता यादव (वय 45) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून, ती आपल्या दोन मुलांसह अप्पापाडा भागात राहते.

ताब्यात घेतलेल्या महिलेसह मालाड पुर्व पोलीस
ताब्यात घेतलेल्या महिलेसह मालाड पुर्व पोलीस

By

Published : Jun 30, 2021, 8:29 PM IST

मुंबई - मालाड पूर्व कुरार पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. लता यादव (वय 45) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून, ती आपल्या दोन मुलांसह अप्पापाडा भागात राहते. या महिलेकडून सुमारे 2 किलो चरस जप्त करण्यात आले. या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात 40 लाख रुपये इतकी किंमत आहे.

मालाड पूर्व कुरार पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. याबाबत माहिती देताना वरिष्ठ पीआय प्रकाश वझे

कुरार पोलिसांना मिळाली माहिती

मालाड पूर्व आप्पापाडा भागात एक महिला चरसचा व्यवसाय करते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर कुरार पोलीस स्टेशनचे पीआय पन्हाळे, एपीआय भोये, महिला पीएसआय पाटील, कवळे, भोगे, अहिरे यांच्यासह इतर पोलीस कर्मच्याऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या महिलेकडून २ किलो चरस जप्त करण्यात आले. या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात 40 लाख रुपये किंमत असल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला गोरेगाव फिल्म सिटीमध्ये काम करणाऱ्या टीव्ही कलाकारांना ड्रग्स विकण्याचे काम करत होती. चौकशीवेळी महिलेचा मोठा मुलगा विजय यादव याला 6 महिन्यांपूर्वी बिहारमध्ये 25 किलो चरसह पकडण्यात आले. तर, (16 जून)रोजी या महिलेचा छोटा मुलगा अजय यादव याला अँटी नारकोटिक्स सेल कांदिवली युनिटने अडीच किलो चरससह अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची किंमत 50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

'पतीच्या निधनानंतर अमली पदार्थांच्या व्यवसायात'

आपल्या पतीच्या निधनानंतर लता यादव आपल्या दोन मुलांच्या मदतीने अमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायात सक्रिय झाली. अजय आणि विजय हे दोन्ही मुलही बिहार व मुंबई येथे हा ड्रग्सचा व्यवसाय करायला लागले. त्यानंतर त्यांनाही याच कामात पकडले आहे. तसेच, कोट्यावधी रुपयांची औषधेही जप्त केली आहेत. लता यादवच्या संपूर्ण कुटुंबाना केवळ चरसचाच व्यवसाय केला आहे. आरोपी लता यादवला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, तीच्या मोठ्या मुलाला बिहार गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर, लहान मुलाला अँटी नारकोटिक्स सेलमध्ये अटक करण्यात आली आहे. तसेच, न्यायालयाने या महिलेला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पीआय प्रकाश वझे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details