महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणीतील साक्षीदाराने फिरवली साक्ष; एटीएसवरच केले खळबळजनक आरोप - National Investigation Agency

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Malegaon Bomb Blast Case ) आणखी एका साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आहे. आजच्या सुनावणीत साक्षीदार 41 ने सांगितले की, एटीएसने त्यांच्यावर दबाव टाकून साक्षीदार बनवून घेतले, असा आरोप केला आहे.

Malegaon Bomb Blast Case
Malegaon Bomb Blast Case

By

Published : Feb 3, 2022, 2:29 PM IST

Updated : Feb 3, 2022, 3:27 PM IST

मुंबई -मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Malegaon Bomb Blast ) 17 साक्षीदाराने आज राष्ट्रीय तपास संस्था ( National Investigation Agency ) न्यायालयात साक्षीदाराने सांगितले की दहशतवाद विरोधी पथकाने ( Anti Terrorism Squad ) त्यांच्यावर दबाव टाकून साक्षीदार बनवून घेतले आहे. साक्षीदारांच्या या आरोपानंतर खळबळजनक उडाली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत एकूण 17 साक्षीदाराने आपले साक्ष बदलली आहे. मुंबईत विशेष एनआयए न्यायालयामध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात रोज सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत 226 साक्षीदारांचा जवाब नोंदवण्यात आली आहे.

मालेगाव स्फोटात आता तत्कालीन एटीएस अधिकारी परमबीर सिंह ( Param Bir Singh ) यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. मालेगाव बॉम्ब स्फोटातील साक्षीदार फितूर झाल्याने एटीएसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण 2008 मालेगाव स्फोट प्रकरणात आज विशेष एनआयए कोर्टात ( NIA Court ) साक्षीदाराने धक्कादायक खुलासे केले आहेत. यात साक्षीदाराने एटीएसवरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याही अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आतापर्यंत 17 साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आहे.

काय म्हणाला साक्षीदार..? -आज झालेल्या सुनावणीत या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक 40 ची साक्ष झाली. साक्षीदाराने न्यायालयाला साक्ष देताना सांगितले की, आमच्या म्हणण्यानुसार जवाब दिला नाही तर त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचविण्यात येईल, असा दबाव एटीएसच्या अधिकाऱ्यांनी साक्षीदारांवर टाकला. आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करावा यासाठी एटीएस दबाव टाकत असल्याचा दावा साक्षीदाराने न्यायालयात केला. या उच्चपदस्थ आरएसएस पदाधिकाऱ्यांमध्ये योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो देवधर, काकाजी, इंद्रेश कुमार यांची नावे होती. तत्कालीन एटीएसचे अधिकारी परमबीर सिंह आणि पोलीस उपायुक्त श्रीराव यांच्यावरील या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.

परमबीर सिंह यांच्यावर काय आरोप..? -काही लोकांची नावे या प्रकरणात घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप साक्षीदाराकडून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो. देवधर काकाजी, इंद्रेश कुमार यांना या गुन्ह्यात गुंतवण्यासाठी दबाव टाकल्याची साक्ष साक्षीदाराने न्यायालयात दिली. त्यामुळे एटीएसची डोकेदुखी वाढली आहे. एनआयएने हजर केलेला साक्षीदार फितूर झाला असून त्यानेच दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी परमबीर सिंह आणि श्रीराव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस -मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस एनआयएच्या विशेष न्यायालयाने जारी केले आहे. रामजी कालसांगर, डांगे, असे त्या दोन फरार आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा -Parambir Singh On Sachin Waze : सचिन वाझेवर तुरुंगात रोज अत्याचार, परमबीर सिंह यांचा खळबळजनक आरोप

Last Updated : Feb 3, 2022, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details