मुंबई -दिंडोशी परिसरात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मुंबई पोलिसांनी ( Mumbai police ) १० तोळे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आहे. यात पोलिसांना उंदरांची मदत लाभली. हे दागिने ज्या महिलेचे होते तिला ते परत करण्यात आले आहे. महिला दागिने असलेली पिशवी घेऊन बँकेत जात होती. वाटेत तिने एका गरीब महिलेच्या मुलाला वडापाव असलेली पिशवी दिली. त्यात दागिने देखील होते. यानंतर आपण वडापावबरोबर दागिने देखील दिल्याचे महिलेला लक्षात आले. महिलेने पोलिसांना माहिती दिली. नंतर पोलिसांनी तपास करत दागिने परत मिळवून दिले.
हेही वाचा -Mumbai Rain Update : मुंबईत पुन्हा पावसाची हजेरी
दिंडोशी पोलीस ( Dindoshi Police ) ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनी परिसरात राहणारी सुंदरी नावाची महिला आपल्या मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी घरात ठेवलेले १० तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यासाठी गेली असताना हा प्रकार उघडकीस आला. सुंदरीला वाटेत एक गरीब स्त्री आणि तिचे मूल दिसले. सुंदरीने पिशवीत ठेवलेला काही वडापाव त्या मुलाला दिला आणि निघून गेली. सुंदरी बँकेत पोहचली तेव्हा तिला समजले की तिने मुलाला दिलेल्या वडापावच्या पिशवीत सोन्याचे दागिनेही होते. सुंदरी लगेच बँकेतून निघून गेली. तिला भिकारीन सापडली नाही. त्यानंतर तिने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.