महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

येत्या 16 डिसेंबरपासून नागपुरात 'विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन' - महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार

विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विधीमंडळाच्या नागपूर येथील होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा झाली.

Nagpur Vidhan Bhavan
नागपूर विधानभवन

By

Published : Dec 10, 2019, 10:11 PM IST

मुंबई -विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधीमंडळाचे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा झाली. येत्या 16 तारखेपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे.

हेही वाचा... 'खडसे सर्वांचे मित्र; पवारांसोबतच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये'

हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयके, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. विधानपरिषदेत 7 अशासकीय विधेयकांवर चर्चा होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील श्री. शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा... पंतप्रधान मोदींनी केले अमित शाहांचे कौतुक

विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई व इतर नेते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details