महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kisan Mahapanchayat : मोदींवर भरवसा नाही.. MSP कायदा मंजूर केल्याशिवाय शेतकरी आंदोलन मागे नाही - टिकैत

तीन कृषी कायदे उद्या संसदेमध्ये परत घेतले जाणार असले तरीसुद्धा मोदींवर भरोसा ठेवू शकत नाही, असे किसान नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी सांगितले आहे. मोदी सरकारने या एक वर्षाच्या कालावधीत आंदोलनामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांची दखल घेतली नसली तरी राज्याने जे शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटूंबाला मदत करावी, अशी मागणी किसान नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.

rakesh tikait
rakesh tikait

By

Published : Nov 28, 2021, 6:57 PM IST

Updated : Nov 28, 2021, 7:20 PM IST

मुंबई - संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे मुंबईच्या आझाद मैदानात "विराट शेतकरी कामगार महापंचायत" (mumbai Kisan Mahapanchayat )चे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी राज्य व देशातील विविध शेतकरी कामगार संघटना व त्यांचे नेते उपस्थित होते. तीन कृषी कायदेउद्या संसदेमध्ये परत घेतले जाणार असले तरीसुद्धा मोदींवर भरोसा ठेवू शकत नाही, असे किसान नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait)यांनी सांगितले आहे. मोदी सरकारने या एक वर्षाच्या कालावधीत आंदोलनामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांची दखल घेतली नसली तरी राज्याने जे शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटूंबाला मदत करावी, अशी मागणी किसान नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केली आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीनंतर भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले की, केंद्र सरकारने एमएसपीच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. टिकैत म्हणाले की केंद्र सरकारने आमच्याशी या मुद्यावर चर्चा करण्याचे टाळले आहे. आता एमएसपीवर सर्वांची नजर आहे. यावर कायदा तयार केला पाहिजे. या संदर्भात एक समिती गठित करून सीड बिल, पेस्टीसाइड यावर चर्चा झाली झाली पाहिजे.

किसान पंचायतीमध्ये बोलताना राकेश टिकैत
किमान आधारभूत किंमत महत्त्वाचा मुद्दा..
ही एक वैचारिक क्रांती आहे. पंजाबला खलिस्तानी, लाल झेंड्याला माओवादी संबोधलं गेलं. आंदोलनात फूट पाडण्याचा पूर्ण प्रयत्न मोदी सरकारने केला. ७५० शेतकरी या एक वर्षाच्या आंदोलनात शहीद झाले. या आंदोलनाचे श्रेय शहीद झालेल्या परिवाराला जाते. मोदी सरकार हे षड्यंत्रकारी, बेइमानी व धोकेबाज असल्याने त्यांचे मन साफ नाही अशी टीकाही टिकैत (Rakesh Tikait on MSP) यांनी केली आहे. ज्याप्रमाणे कोरोना देशासाठी घातक आहे त्याप्रमाणे ३ कृषी कायदे देशासाठी घातक आहेत. एमएसपीचे मोठे वकील नरेंद्र मोदी आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना एमएसपीला कायद्याने मंजुरी द्यावी, असे मोदी म्हणाले होते. आता मोदी म्हणतात एमएसपीने शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे, तर ते नुकसान आम्हाला चालेल असेही टिकैत (Rakesh Tikait on MSP) म्हणाले.
एमएसपीचा फायदा काही उद्योग व्यवसायिकांना होणार होता. त्यासाठी अगोदरच गोदाऊन बनवले गेले आहेत. सरकार रोटीवरून राजकारण करत आहे. त्यासाठी आंदोलनाची सुरुवात झाली आहे. हे आंदोलन संपलेले नाही. गोदाऊन अगोदर बनवले गेले, नंतर कायदा आणला गेला. देशाची संपत्ती विकायला काढली आहे. पण इथे किंम उन-जोंगचे राज्य नाही. हा देश कोरिया नाही. अशी खरमरीत टीकाही टीकैत यांनी केली आहे.
भीक नको, हक्क हवा -
संयुक्त मोर्चा संपूर्ण देशात आंदोलन करणार आहे. समझोता म्हणून तीन कृषी कायदे मागे घेतले ती भीक आम्हाला नको. टेबलवर बसून समझोता करणार आहोत. आंदोलनामधील खटले परत घ्या. जे शहीद झालेत त्यांच्या परिवाराला मदत करा. एसटी कामगारांना मदत करा. जे शहीद झाले आहेत त्यांच्या परिवाराला राज्य सरकारने मदत करावी. एकजूट कायम ठेवा आंदोलन चालू ठेवा. ही वैचारिक क्रांती आहे ही चालूच राहणार.
मोदी सरकारचा कॅमेरा व पेनावर बंदुकीचा पहारा आहे, असे सांगत टिकैत यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर टिपणी केली आहे. पोलीस आंदोलन करू शकत नाहीत, तर त्यांचा आवाज संयुक्त किसान मोर्चा उचलणार, असे सांगत महाराष्ट्राच्या पोलिसांबाबत ही त्यांनी संवेदनशीलता व्यक्त केली आहे.या महापंचायतला देशभरातून शेतकरी नेते उपस्थित होते. युद्धवीर सिंह, राजिंदर सिंह विर्क, आशिष मित्तल, जस्विर कौर, मेघा पाटकर, योगेंद्र यादव, अतुलकुमार अंजाम, दर्शन पाल, अशोक ढवले या सर्वांचं मार्गदर्शन या महापंचायत मध्ये शेतकऱ्यांना लाभले.
Last Updated : Nov 28, 2021, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details