महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Jitendra Awhad on ED action on Patankar : आपल्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही! - जितेंद्र आव्हाड

भारतीय जनता पक्षाकडून सूडबुद्धीने अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात असल्याची टीका महा विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी केली आहे. मात्र, जीतेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad on ED action on Patankar ) यांनी या कारवाईबाबत बोलताना आता "आपल्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही" असे वक्तव्य केले आहे.

Jitendra Awhad on ed action Sridhar Patankar
श्रीधर पाटणकर ईडी कारवाई जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया

By

Published : Mar 23, 2022, 10:00 AM IST

Updated : Mar 23, 2022, 1:34 PM IST

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या कारवाईवर टीका करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून सूडबुद्धीने अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात असल्याची टीका महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी केली आहे. मात्र, जीतेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad on ED action on Patankar ) यांनी या कारवाईबाबत बोलताना आता "आपल्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही" असे वक्तव्य केले आहे.

प्रतिक्रिया देताना उर्जा मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत

हेही वाचा -Increase In Fuel Prices : इंधन दराचा भडका! सलग दुसऱ्या दिवशी 80 पैशांनी वाढ

केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून सूड बुद्धीने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करत आहे. तिथेच राज्य सरकारनेही भाजपच्या काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केली. मात्र, जबरदस्तीने कोणालाही तुरुंगात डांबून ठेवले नाही, असेही जितेंद्र आव्हाड विधानभवनात 22 तारखेला रात्री प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

11 सदनिका जप्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टच्या 11 सदनिकांवर ईडीने कारवाई करत त्या जप्त केल्या. यांची जवळपास साडेसहा कोटी एवढी किंमत सांगितली जात आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह सर्वच नेत्यांनी या कारवाईबाबत टीका केली आहे.

राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न - नितीन राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीने केलेल्या कारवाई संदर्भात बोलताना राज्याचे उर्जा मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी ही कारवाई म्हणजे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारच्या काळात मागील ८ वर्षांमध्ये सर्वात जास्त ईडीच्या कारवाया करण्यात आल्या. त्या तुलनेत काँग्रेसचे सरकार असताना या कारवाया फार कमी प्रमाणात होत होत्या. परंतु, राज्यात सध्या असलेले महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी अशा पद्धतीच्या कारवाया केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. ते विधान भवनात बोलत होते.

हेही वाचा -Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी कोर्टाचे समन्स

Last Updated : Mar 23, 2022, 1:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details