मुंबई -डबल म्युटंटमुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आणखी एक वर्ष तरी कोरोनासोबत काढावा लागेल. मात्र, लस हाच प्रभावी नियंत्रणाचा उपाय आहे, असा दावा कोविड टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जनजीवन सुरळीत होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी - डॉ. तात्याराव लहाने - लसीकरण ठप्प
डबल म्युटंटमुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आणखी एक वर्ष तरी कोरोनासोबत काढावा लागेल. मात्र, लस हाच प्रभावी नियंत्रणाचा उपाय आहे, असा दावा टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लस हाच उपाय
कोणताही विषाणू हा म्युटंट बदलत असतो. कोरोना देखील तीन महिने, सहा महिने किंवा वर्षांनी म्युटंट बदलत असतो. शरीरावर त्याचा किती परिणाम होतो किंवा आरोग्याला ते किती त्रासदायक ठरतात, यावर अवलंबून असते. सध्या डबल म्युंटट झाल्याने मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. तिसऱ्या लाटेच्या वेळी तो तिसरा म्युटंट होईल का, हे सांगू शकत नाही. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने लसीकरण सुरु केले आहे. लसीकरणामुळे सर्दी, खोकला आदी सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवतील. परंतु, मोठ्या प्रमाणात आजार उद्भवणार नाही असे सांगताना किमान एक वर्षतरी जनजीवन सुरळीत होण्यास कालावधी लागेल, असे भाकीत डॉ. लहाने यांनी वर्तवले.
'औषधे, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचे नियोजन करा'
तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आवश्यक त्या औषधांचा साठा आत्तापासून करून ठेवा. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन कमतरता भासणार नाही, यास्वरुपाचे नियोजन करा. ग्रामीण भागातल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ज्ञ डॉक्टर्सनी मनमोकळेपणाने विचाराव्यात, राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स तुम्हाला मार्गदर्शन करतील, असे डॉ. लहाने म्हणाले.
'डबल मास्क घाला, त्रिसूतीचे पालन करा'
राज्यात दुसरी लाट आल्यानंतर रुग्णसंख्या वाढली. वाढत्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले. रुग्णसंख्या यामुळे कमी होत आहे. कोरोना आटोक्यात यावा, यासाठी पंधरा दिवसांनी निर्बंध वाढवले आहे. संख्या कमी होण्यास तेवढा कालावधी लागेल. नागरिकांचा यात सहभाग महत्त्वाचा आहे. सर्वांनी मास्क घातला पाहिजे. शक्यतो थ्री लेअर मास्क घालावा. परंतु, कपड्याचा मास्क असेल तर डबल मास्क घालणे गरजेते आहे. दोन मास्क फायदा देतात. लोकांनी गर्दी करू नये, शारीरिक अंतर राखावे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचे पालन करावे. नागरिकांनी घरीच राहिल्यास स्वतः बरोबरच इतरांनाही कोरोनाची बाधा होणार नाही, असे मत डॉ. तात्याराव लहाने यांनी मांडले.
क्षमेतनुसार लस
राज्यातील १८ ते ४४ वयोगटापर्यंत व्यक्तींना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपासून लसीकरण होणार होते. लसींअभावी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होईल. भारतात दोन कंपन्या लसींचे उत्पादन करतात. राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मिळणाऱ्या लसींची क्षमता किती आहे, त्यानुसार लस देण्याचा निर्णय घेतला जाईल. लस घेण्यासाठी कोविन अॅप तयार केला आहे. तेथे नोंदणी केल्यानंतरच लस मिळेल. कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे
हेही वाचा -महाराष्ट्र दिनानिमित्त लसीकरणाचा मुहूर्त.. १८ ते ४४ वयोगटापर्यंतच्या व्यक्तींना मिळणार लस