महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकनाथ शिंदेंचे बंड भाजपच्या पथ्यावर पडेल का, मॅजिक फिगरसाठी भाजपला करावी लागेल अजूनही कसरत

एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदे यांनी भाजपच्या गुजरातमधील नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे. शिंदे किमान 12 तर कमाल 25 आमदार घेऊन गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा फटका मानण्यात येत आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडीलाही हा मोठा झटका आहे. याच पार्श्वभूमिवर वाचा राज्यातील राजकीय परिस्थितीचा लेखाजोखा.

एकनाथ शिंदेंचे बंड भाजपच्या पथ्यावर पडेल का
एकनाथ शिंदेंचे बंड भाजपच्या पथ्यावर पडेल का

By

Published : Jun 21, 2022, 10:59 AM IST

Updated : Jun 21, 2022, 1:31 PM IST

हैदराबाद -शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदे यांनी भाजपच्या गुजरातमधील नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे. शिंदे किमान 12 तर कमाल 25 आमदार घेऊन गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा फटका मानण्यात येत आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडीलाही हा मोठा झटका आहे.

महाविकास आघआडीची ताकद -राज्यातील सध्य परिस्थितीतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे 56 आमदार आहेत. यातील एका शिवसेना आमदाराचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यांच्याबरोबर इतर लहान पक्षाचे आणि अपक्ष आमदार असे 16 जणांचे पाठबळ आहे. त्यांची एकूण संख्या 168 आहे.

भाजपचे विधीमंडळातील स्थान -दुसरीकडे भाजपचे 106 आमदार आहेत. त्याचबरोबर अपक्ष 5 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. तसेच आरएसपी आणि जनसुराज्य शक्तीचा एक आमदार अशी भाजपची एकूण ताकद 113 आहे. मात्र भाजप नेहमीच असा दावा करत आहे की त्यांच्या पाठिमागे शिवसेना आणि काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचेही आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील निकालावरुन ते स्पष्टही झाले आहे.

मॅजिक फिगर भाजप गाठणार का ? -महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 145 आमदारांची आवश्यकता असते. महाविकास आघाडीकडे सध्या तरी 168 जणांचे समर्थन आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी तब्बल 25 आमदार गुजरातला नेल्याचे वृत्त आहे. ते जर भाजपला जाऊन मिळाले तर भाजपची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. अपक्ष आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडीचा टेकू काढून घेतला तर राज्यात सत्ता परिवर्तन होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यताही आहे. मात्र भाजपला 145 ची मॅजिक फिगर गाठता आली पाहिजे. जर ते शक्य झाले तर सत्ता परिवर्तन होऊ शकते.

भाजपला करावी लागेल अजूनही कसरत - भाजपचे 106, अपक्षांसह इतर पक्षांचे एकूण बळ 113. जरी भाजपला 25 आमदार मिळाले तर 138 आमदार होतील. असे झाले तरी राज्यातील सरकार पडणार नाही. कारण मॅजिक फिगर गाठण्यासाठी 8 आमदार कमी पडतील. त्यामुळे शिंदे यांच्या दबाव तंत्राने इतर काही आमदार जर त्यांना जाऊन मिळाले. तर उद्धव ठाकरे सरकारला धोका होईल. अन्यथा शिंदे यांचे बंड भाजपच्या उपयोगी येणार नाही.

Last Updated : Jun 21, 2022, 1:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details