महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीचे पुन्हा समन्स - SANJAY RAUT AND ED

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांना 11 जानेवारी रोजी ईडी चौकशी साठी हजर राहण्याचे पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.

ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे पुन्हा समन्स
ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे पुन्हा समन्स

By

Published : Jan 6, 2021, 1:55 PM IST

मुंबई -पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून तपास केला जात असताना यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. त्यांना ११ जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सागंण्यात आले आहे. यापूर्वी 5 जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना ईडी कार्यालय मध्ये चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, त्यांनी एक दिवसआधी म्हणजे ४ जानेवारीलाच अचानक ईडी कार्यालयामध्ये हजरी लावली होती.

वर्षा राऊत यांची ईडी अधिकाऱ्यांनी 4 तास चौकशी केली. मात्र वर्षा राऊत या माध्यमांना चकवा देत कार्यालयात आल्या व परत देखील गेल्या होत्या.

काय आहे प्रकरण
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना पीएमसी बँकेकडून 95 कोटी रुपयांचे कर्ज हे कुठल्याही योग्य कागदपत्रांची पूर्तता न करता पुरविण्यात आल्याचे तपासात समोर आलेले होते. या 95 कोटी पैकी जवळपास 1 कोटी 6 लाख रुपये प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी यांच्या खात्यामध्ये वळते केले होते. या 1 कोटी 6 लाख पैकी तब्बल 55 लाखांची रक्कम दोन टप्प्यात बिनव्याजी कर्ज स्वरूपात वर्षा राऊत यांना देण्यात आलेली होती. डिसेंबर 2010 मध्ये 50 लाख , 2011 मध्ये पाच लाख अशा दोन टप्प्यात 55 लाख रुपये बिनव्याजी कर्ज म्हणून वर्षा राऊत यांना माधुरी राऊत यांच्याकडून मिळाले असल्याचे तपासात समोर आलेले आहे. या 55 लाखांचा वापर वर्षा राऊत यांच्याकडून दादर पूर्व येथील फ्लॅट विकत घेण्यासाठी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details