मुंबई- पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मुलाच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना काल शुक्रवारी घडली. संतनकृष्णन शेषाद्री (वय 55) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. आंबोली पोलिसांनी दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Wife Murder Husband : कौटुंबिक त्रासास कंटाळुन मुलाच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या - mumbai murder news
आरोपी पत्नीने मुलाच्या मदतीने बेडरूमध्ये पतीची बेदम मारहाण केली. त्याचा मृत्यू न झाल्याने सातव्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आले. तसेच भिंतीवरील रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मृत पतीकडून पत्नीला त्रास होत होता. सततच्या कौटुंबीक त्रासाला कंटाळून पत्नीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी पत्नीने मुलाच्या मदतीने बेडरूमध्ये पतीची बेदम मारहाण केली. त्याचा मृत्यू न झाल्याने सातव्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आले. तसेच भिंतीवरील रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आंबोली पोलिसांना एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा फोन आला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर घराची तपासणी केली. त्यानंतर ही हत्या असल्याचे निदर्शनास आले. आरोपीची चौकशी केली असता, आपल्या पतीने यापूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र अखेर रोजचे भांडण, पैशाची मागणी यामुळं हत्या केल्याची कबूली दिली.
आंबोली पोलिसांनी आरोपी जयशीला संतनकृष्णन शेषाद्री (वय 52) व मुलगा अरविंद संतनकृष्णन शेषाद्री (वय 26) यांच्याविरोधात प्रकाश दगडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केली. त्यानुसार दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास अंबोली पोलीस करित आहे.