महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hindutva Politics : पवारांना का ओढले जात आहे हिंदुत्वाच्या राजकारणात? - Sharad pawar hindutva politics

गेल्या काही दिवसांपासून राज्यात यांनी हिंदुत्व ( hindutva ) आणि हनुमान चालीसा यांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपा आणि मनसेने सुरू केलेल्या या राजकारणात पद्धतशीरपणे शिवसेनेला खेचले गेले. मात्र या प्रकारांपासून दूर राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मनसे आणि भाजपाने विविध माध्यमातून ओढण्याचा प्रयत्न चालवला ( hindutva politics ) आहे का? नेमकं यामागील काय राजकारण आहे ते जाणून घेऊया.

Hindutva Politics
शरद पवार

By

Published : Jun 7, 2022, 6:00 PM IST

मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात मशिदी वरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन पुकारून नव्या धार्मिक वादाला पुन्हा एकदा खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. मनसेने सुरू केलेल्या हनुमान चालीसा आंदोलनामध्ये भाजपाने त्यांना साथ दिली आणि नवनीत राणा आणि रवी राणा यांनी या प्रकरणात जोरदार उडी घेतली. ( hindutva politics )

राज ठाकरे यांचा पवारांवर निशाणा -मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत पहिल्यांदा शरद पवारांना नास्तिक संबोधून त्यांच्यावर हल्ला चढवला. पवारांनी आपल्या गणपती पूजनाचा व्हिडिओ प्रसारित करीत त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार हे नास्तिक आहेत आणि ते हिंदुत्व मानत नाहीत अशा पद्धतीने त्यांची प्रतिमा तयार करण्याचा मनसे आणि भाजपचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच हिंदुत्व आणि हनुमान चालीसा या आंदोलनांपासून दूर राहणाऱ्या शरद पवारांना यात गोवण्यासाठी त्यांनी एके ठिकाणी वाचलेल्या एका कवितेचा जाणीवपूर्वक उल्लेख भाजपाने केला. यात त्यांनी वाचलेली कविता अर्धवट एडिट करून वायरल करण्यात आली.

केतकी चितळे पुन्हा घसरली -केतकी चितळे या अभिनेत्रीच्या माध्यमातून एक फेसबुक पोस्ट प्रसारित करण्यात आली होती. शरद पवार यांच्यावर ब्राम्हण द्वेष्टे असल्याचा आरोप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना काहीतरी करून या वादात खेचण्याचा आणि त्यांची हिंदुत्व विरोधी किंवा ब्राह्मण विरोधी प्रतिमा निर्माण करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा झाली होती.

तरीही भाजपा यशस्वी होणार नाही - ताजनेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर चिखल फेक करण्याचा त्यांच्या बद्दल खोटे पसरवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने चालवलेला आहे. आपणच केवळ हिंदूंचे आणि धर्माचे पाईक आहोत हे दाखवून एका विशिष्ट वर्गाला बहुजन वर्गापासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार कोणत्याही जातीयतेमध्ये अडकत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांना या प्रकरणामध्ये कसे बोलता येईल राष्ट्रवादी काँग्रेसला कसे बदनाम करता येईल आणि हिंदू मतांचे कसे धोबीकरण करता येईल. यासाठी भाजपने चालवलेला हा सर्व खटाटोप आहे. चित्रा वाघ, नवनीत राणा, केतकी चितळे यांच्या माध्यमातून पक्षाला आणि पवार यांना कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तरी यात भाजपा आणि मनसे यशस्वी होणार नाही कारण आता सर्व मतदार आणि समाज हा शहाणा सुज्ञ झालेला आहे. मतदार आता ज्ञानी झालेला आहे त्यामुळे धर्माच्या राजकारणात कोणीही अडकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्या अर्चना ताजणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न - सपाटेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता मनसे आणि भाजपा यांचा या निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून भाजपाने घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असून पुणे पिंपरी चिंचवड कल्याण डोंबिवली या तीन महत्त्वाच्या महानगरपालिका सत्ताधारी पक्षांकडे जाण्याची शक्यता दाट आहे. मुंबईसह या चारही शहरांमध्ये हिंदुत्ववादी विचारांना मानणाऱ्या मतदारांची संख्या अधिक आहे. त्यासाठी या चार शहरांमध्ये मनसेला सोबत घेऊन हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोणतीही निवडणूक स्वतःच्या मुद्द्यांवर घेऊन जाण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो. त्यानुसार ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेऊन जाण्याचा आणि त्यात बाकीच्या पक्षांना उडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. म्हणूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसलाही या मुद्द्यावर खेचून आणत आहेत आणि त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषण दिलीप सपाटे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -Who will win key RS seat ? राज्यसभेची सहावी जागा कोणाची? शुक्रवारी फैसला, सेनेच्या आमदारांना ट्रायडंटमध्ये हलविले

ABOUT THE AUTHOR

...view details