मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेला सोशल मीडियातून लक्ष्य केले आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट शेअर करत वाझे यांच्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
भाजपचे ट्विट
"सचिन वाझे यांना १० दिवसांची NIA कोठडी मिळाली. पोलिसांची इनोव्हा तिथे कशी? अटक झालेले वाझेच या प्रकरणाचे तपास अधिकारी कसे? संजय राऊत वाझेंना पाठीशी का घालताहेत? वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली? ठाकरे सरकार, हे सगळं स्पष्ट होईल, हिरेन कुटुंबाला न्याय मिळेल!" असे ट्विट भाजपच्या अकाऊंटवरून करण्यात आले आहे.
भाजपने ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे भाजपचे दुसरे ट्विट
"सोयीचं राजकारण - शिवसेनेच्या लाडक्या सचिन वाझे यांचा सहभाग होता, ते मनसुख हिरेन प्रकरण तपास NIAकडे देण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. खासदार संजय राऊत यांनीही मुंबई पोलीस, ATS सक्षम वाटत होतेच. मात्र, भीमा कोरेगावचा तपास त्याच मुख्यमंत्र्यांनी परस्पर NIAकडे दिला..." असे दुसरे ट्विट भाजपने केले आहे.
भाजपने ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे वाझेंवर कारवाईची फडणवीसांची मागणी
अँटिलिया प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृत्यु झाल्यानंतर सचिन वाझेंवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. वाझेंना पाठिशी का घातले जात आहे असा सवाल विचार त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. या मुद्द्यावरून सदनात चांगलाच गदारोळही बघायला मिळाला.
एनआयएकडून वाझेंना अटक
एनआयएने शनिवारी 13 मार्च रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझेंना अटक केली. त्यापूर्वी जवळपास 12 तास त्यांची NIA ने चौकशी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 286, 465, 473, 506 (2), 120 ब आणि 4 (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -'एनआयएने केलेली कारवाई म्हणजे मुंबई पोलिसांच्या अधिकारावर अतिक्रमण'