महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Why ED taking Action Against Sanjay Raut : संजय राऊतांवर ईडीची कारवाई सुरू, जाणून घ्या, आरोप आणि कारणे - ऑडिओ व्हायरल

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांच्या मुंबईतील निवासस्थानी अंबलबजावणी संचालनालयाने ( ED Officers ) छापा टाकला. पत्रा चाळ आर्थिक गैरव्यवहारच्या प्रकरणात त्यांची याआधी तीन वेळा चौकशीही झाली आहे. आज ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला. ईडी संजय राऊत यांना अटक करण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Jul 31, 2022, 10:19 AM IST

Updated : Jul 31, 2022, 11:09 AM IST

मुंबई -शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांच्या मुंबईतील निवासस्थानी अंबलबजावणी संचालनालयाने ( ED Officers ) छापा टाकला. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर पहायला मिळत आहेत. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अनेकांकडून सतप्त प्रतिक्रीया येत आहेत. जाणून घेऊयात काय आहे नेमक पत्राचाळ घोटाळा प्रकरण.

संजय राऊतांवर ईडीची कारावाई

काय आहे पत्राचाळ घोटाळा ? -मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा पत्राचाळ घोटाळा सुरू झाला ( Patra chawl corruption ) . ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते.



पत्रा चाळीची स्थिती काय? -चौकशीअंती घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या विकासकाकडून राज्य सरकारने प्रकल्प काढून घेतला आणि तो म्हाडाकडे सोपवला. रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी सरकारने सेवानिवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार जूनमध्ये पत्राचाळ पुनर्विकासाला राज्य मंत्रिमंडळाकडून परवानगी देण्यात आली. 25 ऑगस्ट 2021 च्या आकडेवारीच्या आधारे प्राथमिक माहितीनुसार पुनर्वसन इमारतींचे आतापर्यंत केवळ 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 60 टक्के काम पूर्ण करून घरांचा ताबा देण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील असे म्हसे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पात म्हाडाचाही हिस्सा असून म्हाडाला विक्रीसाठी 2700 घरे मिळणार आहेत. या घरांच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 2700 मधील 356 घरांसाठी मंडळाने 2016 मध्ये सोडत काढली असून आज पाच वर्षे झाली या घराचे विजेते ताबा कधी मिळेल या प्रतीक्षेत आहेत. म्हाडाच्या विक्रीयोग्य घरांच्या इमारतीच्या कामाला सुरुवात झाल्यास या विजेत्यांनाही दिलासा मिळणार आहे.


जमीन अन्य आठ बिल्डरांना विकली -गुरु आशिष कंपनी ( Guru Ashish Company ) चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.

जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली -ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतांचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांचा मित्र आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीकडून 83 लाखांचे कर्जही घेतले ( Varsha Raut took 83 lakhs loan ) होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.

प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ प्रकरण नेमक आहे काय? - ज्या प्रकरणात संजय राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे, त्याबद्दल बोलायचे झाले तर ते प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन प्रकरण आहे. यापूर्वी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची 2 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. याशिवाय प्रवीण राऊत यांची 9 कोटींची मालमत्ता त्यावेळी जप्त करण्यात आली होती. तर पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणाची चौकशी करणार्‍या ईडीला फेब्रुवारीमध्ये माहिती समजली होती, की प्रवीण राऊत यांनी त्यांच्या पत्नीच्या खात्यातून वर्षाला 55 लाख रुपये दिले होते. संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हॉटेलमध्ये राहण्याचीही व्यवस्था आणि तिकिटे बुक करण्यात आली असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले होते.

पीएमसी बँक घोटाळ्यातही प्रवीण राऊत - 2 जानेवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणामध्ये अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधातील खटला सुरु आहे. यापूर्वी 31 डिसेंबर 2020 रोजी प्रवीण राऊत यांची 72 कोटी 65 लाखांची स्थावर मालमत्ता पीएमसी बॅक घोटाळाप्रकरणी ईडीने जप्त केलीय असंही ईडीने स्पष्ट केलंय.

ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण झाला वाद -खासदार संजय राऊत यांचा एक खळबळजनक ऑडिओ व्हायरल ( Sanjay Raut Viral Audio clip ) होत आहे. ज्यामध्ये ते एका महिलेला मालमत्तेबाबत गलिच्छ शब्दात शिवीगाळ करत आहेत. संजय राऊतानी एका महिलेशी आपल्या नावावर मालमत्ता केल्यामुळे वाद घालत आहेत. संजय राऊत या महिलेला आणखी वाद घातल्यास तिच्यावर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकीही देत ​​आहेत. मात्र, ईटीव्ही भारत या ऑडिओला दुजोरा देत नाही.

हेही वाचा -Arvind Sawant On ED Action : संजय राऊतांवरील ईडीची कारवाई सुडाची,भाजपशी जुळवून घेण्यासाठी दबाव - अरविंद सावंत

Last Updated : Jul 31, 2022, 11:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details