महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्रात सरकार स्थापण करण्यात भाजपला वेळ का?, गिरीश चोडणकर यांचा सवाल - girish chodankar latest news

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 'जेव्हा 2017 मध्ये गोवा विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला तेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला लोकांनी निवडून दिले होते. सरकार स्थापनेसाठी आम्ही त्याच रात्री राज्यपालांकडे दावा केला होता. तरीही काँग्रेसने उशीरा केल्यामुळे आम्ही दावा केला असे म्हणणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात आठ दिवस झाले तरीही सत्ता स्थापन करता येत नाही. त्यांना यापासून कोणी रोखले?', असा सवाल चोडणकर यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रात सरकार स्थापण्याला भाजपला वेळ का?, गिरीश चोडणकर यांचा सवाल

By

Published : Nov 1, 2019, 2:36 AM IST

पणजी -गोवा विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसने राज्यपालांना भेटण्यास वेळ लावल्यामुळे भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला होता. असा दावा करणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातील निवडणूक निकालाला आठवडा होत आला तरीही सरकार बनविण्यापासून कोणी अडवले आहे?, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

हेही वाचा -सेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही - बाळासाहेब थोरात

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 'जेव्हा 2017 मध्ये गोवा विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला तेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला लोकांनी निवडून दिले होते. सरकार स्थापनेसाठी आम्ही त्याच रात्री राज्यपालांकडे दावा केला होता. तरीही काँग्रेसने उशीरा केल्यामुळे आम्ही दावा केला असे म्हणणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात आठ दिवस झाले तरीही सत्ता स्थापन करता येत नाही. त्यांना यापासून कोणी रोखले?', असा सवाल चोडणकर यांनी यावेळी केला.

दरम्यान, काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी खासदार आणि इंदिरा गांधी सरकारमध्ये मंत्री असलेले एदुआर्द फालेरो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रतिभा बोरकर, प्रतिमा कुतिन्हो, प्रसाद आमोणकर, माजी उपसभापती शंभु भाऊ बांदेकर आणि पणजी मंडळ काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details