महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena on PFI: पीएफआयवर कारवाईस विलंब का? शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींचा केंद्र सरकारला सवाल - what is pfi

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा (Slogans of Pakistan Zindabad) दिल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पोलीसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. आता, शिवसेनेनं या प्रकरणात उडी घेतली असून, पीएफआयवर (PFI) कारवाईस विलंब का? असा सवाल शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींनी (mp priyanka chaturvedi) केंद्र सरकारला केलाय.

Shivsena on PFI
पीएफआयवर कारवाईस विलंब का? शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींचा केंद्र सरकारला सवाल

By

Published : Sep 24, 2022, 6:02 PM IST

मुंबई:पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा (Slogans of Pakistan Zindabad) दिल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पोलीसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. आता, शिवसेनेनं या प्रकरणात उडी घेतली असून, पीएफआयवर (PFI) कारवाईस विलंब का? असा सवाल शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींनी (mp priyanka chaturvedi) केंद्र सरकारला केलाय. तसेच काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) नेहमी म्हणतात की, संपूर्ण काश्मीर आपल्याला मिळणार आहे. मग त्याची तारीख कधी जाहीर करणार आहात? असा प्रश्न चतुर्वेदींनी उपस्थित केला.

कारवाईला उशीर का ? पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचा कट रचला गेला आहे. पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद नारे देण्यात आले. पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी देखील दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सर्व प्रकरणावर केंद्र सरकारचे कान पकडले. कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना कारवाईला उशीर का झाला? असा प्रश्न उपस्थित केला.

पीएफआयवर कारवाईस विलंब का? शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींचा केंद्र सरकारला सवाल

तसेच ज्यांनी नारे दिले त्या सर्वांवरती गून्हे दाखल करून जेलमध्ये टाकावे अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली. प्रत्येक दिवशी भारताविरोधात गंभीर वक्तव्य करत आहे. पीएफआयकडून अशातच घोषणाबाजी होत असेल तर त्यांच्यावरती कारवाई व्हावीच, त्याच बरोबर त्यांच्यावरती कारवाईस हलगर्जीपणा करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. देशाविरोधात कारवाया करणाऱ्यांविरोधात शिवसेना नेहमीच लढत आली आहे. आणि हीच भूमिका कायम असल्याचे चतुर्वेदी म्हणाल्या.

पीएफआयचा प्रभाव वाढतोय केरळ, कर्नाटक आदी राज्यांमध्ये पीएफआयचा प्रभाव वाढतोय. केंद्र सरकारने त्यांच्यावरती कारवाई करायला हवी होती. शिवसेनेने सुरुवातीपासूनच पीएफआयसारख्या संघटनांवरती कारवाईची मागणी आहे. मात्र, अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार जे पाकिस्तानमध्ये न बोलवताच जातात. तेथील पंतप्रधानांच्या भेटीगाठी घेऊन मिठया मारतात, त्यांच्याबाबत काय बोलावे, असे चतुर्वेदी म्हणाल्या. जम्मू आणि काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की, संपूर्ण काश्मीर आपल्याला मिळणार आहे. त्याची तारीख हे ५६ इंचची छाती असलेले पंतप्रधान कधी जाहीर करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details