मुंबई -शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या मंत्रीमंडळ बैठकीला ( cabinet meet ) बोटावर मोजण्याएवढेच मंत्री उपस्थित होते. सरकार गडगडण्याच्या दिशेने असताना शिवसेनेच्या (ShivSena ) अनेक मंत्र्यांसह काँग्रेस ( Congress ), राष्ट्रवादी काँग्रेसच्याही ( NCP ) काही मंत्री बैठकीकडे फिरकलेच नाहीत. राज्य मंत्रीमंडळात एकूण 46 मंत्री आहेत. त्यातील अनेकांनी या बैठकीला दांडी मारली.
राज्य मंत्रीमंडळातील स्थिती -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकूण 46 मंत्री आहेत. यामद्ये कॅबिनेट मंत्री 30, राज्यमंत्री 13 आहेत. यातील अगदी मोजकेच मंत्री शेवटच्या घटका मोजत असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीला उपस्थित होते.
काँग्रेस दोन मंत्री अनुपस्थित -या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये काँग्रेसचे 10 मंत्री आहेत. आजच्या बैठकीला सुनील केदार आणि वर्षा गायकवाड हे दोघे अनुपस्थित राहिले. तर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, असलम शेख, विजय वडेट्टीवार, के. सी पाडवी हे आठ मंत्री उपस्थित होते. मंत्रीमंडळातील दोन राज्यमंत्री सतेज पाटील आणि विश्वजीत कदम हे दोघे बैठकीस उपस्थित होते.