महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वरळीत 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे? अमृता फडणवीसांच्या टीकेला मलिकांचे उत्तर - Who owns a flat worth Rs 200 crore in Worli? Malik's reply to Amrita Fadnavis's criticism

अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पावडरच्या पैशांतून कुणाचे अल्बम तयार झाले? वरळीत 200 कोटींचे फ्लॅट कुणी घेतले? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.

वरळीत 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे? अमृता फडणवीसांच्या टीकेला मलिकांचे उत्तर
वरळीत 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे? अमृता फडणवीसांच्या टीकेला मलिकांचे उत्तर

By

Published : Nov 10, 2021, 12:30 PM IST

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे रियाज भाटीशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पावडरच्या पैशांतून कुणाचे अल्बम तयार झाले? वरळीत 200 कोटींचे फ्लॅट कुणी घेतले? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.

वरळीत 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे? अमृता फडणवीसांच्या टीकेला मलिकांचे उत्तर

वरळीत कुणाचा 200 कोटींचा फ्लॅट?

"चोर मचाए शोर, यांची काळी संपत्ती काढायची वेळ आली तर ते ही काढू. बेनामी संपत्ती हा विषय नाही, पण वेळ आल्यावर ते ही काढू. महिलेविषयी मी काहीही बोलू इच्छित नाही. माझ्यावर कितीही आक्षेप घेतले तरी महिलेला मी उत्तर देऊ इच्छित नाही. माझ्या जावयावर काय खटला आहे, ते एनडीपीएस कोर्टाच्या जामीन आदेशात स्पष्टपणे लिहिले आहे. माझ्यावर काळ्या पैशांचा आरोप लावत आहेत. तर कोणत्या व्यक्तीच्या नावे वरळीत दोनशे कोटींचा फ्लॅट आहे? बीकेसीत कुणी फ्लॅट घेतला आणि कुणाच्या नावे राहत आहे? काळा पैसा आणि बेनामी संपत्तीचाच विषय आहे, तर ठिक आहे सुरू करा. आम्ही तर पूर्णपणे तयार आहोत." असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांचे ट्विट

अमृता फडणवीस यांनी याआधी ट्विटरवर एक ट्विट टाकून मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. "बिगड़े नवाब ने- प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स बुलाई- लेकिन हर बार झूठ और मक्कारी की ही बाते हमे सुनाई, लक्ष्य इनका एक ही है,मेरे भई- बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई!" असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details