महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Who Is yusuf lakdawala : राणा दाम्पत्यानी ज्याच्याकडून कर्ज घेतले तो युसूफ लकडावाला नेमका कोण? - युसूफ लकडावाला कोण होता मराठीत

संजय राऊत यांनी ट्विट ( Sanjay Raut Tweet On Navneet Rana ) करत खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या युसुफ लाकडवाला ( Yusuf Lakdwala ) याच्याकडून 80 लाखाचे कर्ज घेतल्याचा आरोप केला. मात्र, या आरोपनंतर युसुफ लाकडवाला ( Who Is Yusuf Lakdwala ) नेमका कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

yusuf lakdawala builder
yusuf lakdawala builder

By

Published : Apr 27, 2022, 3:42 PM IST

Updated : Apr 27, 2022, 4:19 PM IST

मुंबई -राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) व आमदार रवी राणा ( Ravi Rana ) दाम्पत्याचा आता आणखी एक कारनामा संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुढे आणला. राऊत यांनी मंगळवारी ट्विट ( Sanjay Raut Tweet On Navneet Rana ) करत दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या युसुफ लकडावाला ( Yusuf Lakdwala ) याच्याकडून राणा दाम्पत्याने 80 लाखाचं कर्ज घेतल्याचा आरोप केला. यासंदर्भात आज पुन्हा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ED ने राणा दांपत्याची चौकशी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच या प्रकरणात अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचेदेखील संजय राऊत म्हणाले.

कोण आहे युसूफ लकडावाला?

संजय राऊत यांनी ज्या युसूफ लकडावाला याचे नाव घेतले. तो नेमका कोण आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. युसूफ लकडावाला हा मुंबईतील एक बिल्डर होता. तो दाऊच्या डी गँगचा फायनान्सर असल्याची चर्चा होती. तसेच मनी लॉन्ड्रिंगसह आरोपाखाली त्याला ईडीने अटक केली होती. दरम्यान, आर्थर रोड कारागृहात वयाच्या 76 व्या वर्षी कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला. याच युसूफ लकडावालाकडून खासदार नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा -नवनीत राणांच्या अडचणीत वाढ; आता लकडावाला कर्ज प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता!

Last Updated : Apr 27, 2022, 4:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details