महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोळी बांधवांना मुंबईबाहेर फेकण्याचे काम कोण आणि का करत आहे - संदीप देशपांडे

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मासळी बाजार मुंबईशी शान असल्याचे सांगत त्यांना मुंबईबाहेर फेकण्याचे काम कोण आणि का करते आहे, असा प्रश्न देशपांडे यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे.

sandeep deshpande tweet on koli brother
sandeep deshpande tweet on koli brother

By

Published : Aug 23, 2021, 3:44 PM IST

मुंबई -क्रॉफड मार्केट येथील वर्षोनुवर्षे असणारे छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार आणि दादर येथील मीनाताई ठाकरे मासळी मंडईचे निष्कासन करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या मच्छीमार विक्रेत्यांना जवळपास जागा न देता ऐरोली येथे पर्यायी जागा देण्यात आली आहे. यामुळे कोळी बांधवांनी महानगरपालिकेविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या वादात आता मनसेनेदेखील उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मासळी बाजार मुंबईशी शान असल्याचे सांगत त्यांना मुंबईबाहेर फेकण्याचे काम कोण आणि का करते आहे, असा प्रश्न देशपांडे यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे -

खरे तर आगरी, कोळी बांधव हे मुंबई चे मूळ रहिवाशी. त्यांनाच सध्या विस्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे. अनेक ठिकाणचे मासळी बाजार बंद केले जात आहेत. कोळीवाडे उध्वस्त केले जात आहेत. विमान तळाला दि.बा. पाटील साहेबांच्या नावाचा आग्रह हे तर कारण नाही ना?, असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे. दरम्यान, क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजाराची इमारत धोकादायक अवस्थेत असल्यामुळे ती पाडण्यात आली. त्याबरोबर दादर येथील मासी बाजारी हटवण्यात आला आहे. मात्र, त्यांना ऐरोली आणि मरोळ येथे जागा देण्यात आली आहे. तिथे जाण्यास कोळी बांधवांचा विरोध आहे. यामुळे त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या बुधवारी २५ ऑगस्टला पालिका मुख्यालयावर कोळी बांधव मोर्चाही काढणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन राज यांनी दिले होते.

हेही वाचा -'केंद्र सरकार आम्हाला मुनीम बनवू पाहत आहे'; 'एचयुआय'डी प्रक्रियेविरोधात सराफ व्यावसायिक आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details