महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Teesta Setalvad Captured By ATS : एटीएसने ताब्यात घेतलेल्या तिस्ता सेटलवाड कोण आहेत - सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस

तिस्ता सेटलवाड ( Teesta Setalvad ) यांना गुजरात एटीएसने एका गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतले (captured by ATS) आहे. सटेलवाड ह्या मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणुन ओळखल्या जातात. त्या सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस (Citizens for Justice and Peace) किंवा सीजेपी नावाच्या संघटनेच्या सचिव आहेत. पाहुया त्यांचा जीवन प्रवास (Who is Teesta Setalvad).

Teesta Setalvad
तिस्ता सेटलवाड

By

Published : Jun 25, 2022, 7:43 PM IST

मुंबई: तिस्ता सटेलवाड या मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आहेत. ते सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस (Citizens for Justice and Peace) किंवा सीजेपी नावाच्या संघटनेचे सचिव आहेत. जी गुजरातमधील जातीय दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी 2002 मध्ये स्थापन करण्यात आली होती. सीजेपी हे 2002 च्या गुजरात दंगलीतील कथित सहभागाबद्दल नरेंद्र मोदी आणि इतर 62 सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला चालवण्याची मागणी करणाऱ्या सहकारी याचिकाकर्ते आहेत. त्यानंतर त्या 62 आरोपींपैकी चार जणांची नावे आरोपपत्रात दाखल करण्यात आली पण, या सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे.

तीस्ता सेटलवाड यांचा जन्म ९ फेब्रुवारी, १९६२ साली मुंबईत झाला. मुंबईस्थित वकील अतुल सेटलवाड आणि पत्नी सीता सेटलवाड यांच्या गुजराती हिंदू कुटुंबात त्या जन्मल्या.तीस्ता यांचे आजोबा भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल होते. २००२ मध्ये गुजरातमधील जातीय हिंसेच्या पीडितांना न्याय देण्यासाठी लढा देणाऱ्या या संस्थेची स्थापना सिटीझन्स फॉर जस्टीस ॲंड पीस (सिजेपी) या संस्थेच्या सचिव आहेत. एलफिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांचा वेगवेगळ्या विद्यार्थी चळवळींशी संपर्क आला. त्या काळात संपूर्ण देशात आणीबाणीचे वातावरण होते. तेव्हाच तीस्ता यांच्या राजकीय आणि सामाजिक जाणिवा जागृत झाल्या. लोकांसाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी पत्रकारिता करायचे ठरवले.

बी. ए.ची पदवी मिळाल्यावर लगेच तीस्ता यांना इंग्रजी या दैनिकात बातमीदाराची नोकरी मिळाली. मुख्य धारेतील पत्रकारितेच्या आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या मोठ्या प्रकाशनांमध्येही काम केले. सुरुवातीला फक्त बातमीदार, मग विशेष प्रतिनिधी आणि नंतर ज्येष्ठ प्रतिनिधी अशा चढत्या पदांवर काम करताना मंत्रालय, महापालिका, शिक्षण, ग्रामीण, कामगार अशा अनेक विषयावरचा भरपूर अनुभव त्यांनी मिळवला. गर्भ लिंगपरीक्षा विरोधी कायदा महाराष्ट्रात मंजूर व्हावा म्हणून त्यांनी प्रत्यक्ष महिला आंदोलनामध्येही भाग घेतला. देशभर गाजलेलं राजस्थान सती प्रकरण झालं तेव्हा तीस्ता यांनी राजस्थानात प्रत्यक्ष दौरे करून लिहिलेली वार्तापत्र लक्ष्यवेधी ठरली.

१९९२-९३ साली मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतातील काही हिंदू संघटनांनी अयोध्येची बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईत दंगलींची सुरुवात झाली. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातली धर्मांध मंडळी रस्त्यावर उतरली आणि खुलेआम कत्तल सुरू झाली. जाळणे, कापणे, फोडणे, तोडणे अशा विध्वंसक कृतींनी मुंबईत थैमान घातले. या परिस्थितीत तीस्ता या वॉर रिपोर्टर प्रमाणे काम करत होत्या. शक्य तेवढ्या घटनास्थळी हजर राहून तीव्र पण संयमित शब्दांत वर्ताकरण करत होत्या. दंगल रोखण्यासाठी तैनात केलेले पोलिसच समाजविरोधी कृत्यात सामील झाले आहेत असा आरोप त्या करत.

आपण जरी जगातली फार मोठी लोकशाही आहोत असं स्वतःच म्हणवून घेत असलो तरी प्रत्यक्षात लोकशाही आहे कुठ ? सर्वसामान्य मतदार मत देतो आणि त्यातूनच इथली सरकारे बनतात यात शंकाच नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा, मंत्रिमंडळ असा जो इथला मनोरा आहे त्यामध्ये या सामान्य माणसाला काय स्थान आहे? विधानसभेत किंवा लोकसभेत जे निर्णय होतात ते सामान्य माणसाच्या इच्छेनं होतात का? त्याच्या हिताचे होतात का ? मग कुठली आलीय लोकशाही ? आणि नसलेल्या लोकशाहीचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे ? असे त्या सांगायच्या.

तीस्ता सेटलवाड यांनी केंद्र सरकारचे १.१४ कोटी रुपये सबरंग या स्ंस्थे मार्फत खाल्याचा आरोप त्यांचे निकटचे सहकारी रईस खान पठाण यांनी केला होता. शिक्षणासाठी मिळालेले पैसे सामाजिक सलोखा बिघडवण्यास वापरला असा आरोपही यामध्ये आहे. यामुळे १.१४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा अहमदाबाद येथे दाखल आहे. गुलबाग सोसायटी मधील रहीवासी तीस्ता सेटलवाड यांनी स्मरणिकेसाठी मिळालेल्या पैशांचा अपहार केला असा आरोपही त्यांच्यावर आहे. तीस्ता सेटलवाड यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआय ने त्यांच्या कार्यालयावर सन २०१५ मध्ये छापे घातले होते. त्यांनी फोर्ड फाउंडेशन कडून सुमारे दोन लाख नव्वद हजार डॉलर्स घेतले असा आरोपही त्यांच्यावर आहे. तसेच सरकारी कामात अडथळे आणने, खटल्यात खोटी साक्ष देणे, पुराव्वे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर आहेत.

हेही वाचा : Inquiry By Teesta Setalvad : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड गुजरात ATS कडून ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details