मुंबई -उपराकार लक्ष्मण माने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कष्टकऱ्यांच्या व्यथा सांगताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली. या कवितेनंतर पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले, अशी टीका भाजपने केली होती. त्यातच आता अभिनेत्री केतळी चितळेने शरद पवारांवर अभद्र भाषेत टीका केली आहे.
केतकी चितेळेने शरद पवार यांच्या वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये शरद पवारांच्या व्यंगावर टीप्पणी करण्यात आली आहे. केतकीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांनीच केतकीवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर तर केतकीला ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली ( Ketaki Chitale Controversy ) आहे.
कोण आहे केतकी चितळे ( Who Is Ketaki Chitale ) - छोट्या पडद्यावरील 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेत केतकीने भूमिका साकारली होती. त्यामुळे महाराष्ट्रतील घराघरा ती पोहचली होती. मात्र, त्यानंतर ती कोणत्याही भूमिकेत अथवा मालिकेत दिसली नाही. पण, केतकी तिच्या भूमिकांमुळे कमी तर वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत राहिली आहे. त्याचसोबत, एपिलेप्सी या आजाराने ती ग्रासली असल्याचे तीने सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले होते. तेव्हा ती चर्चेत आली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख - छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातील स्मारकाबाबत कॉमेडियन अग्रिमा जोशुआने वक्तव्य केले होते. या प्रकणावरुन तिच्यावर टीका करण्यात आली होती. तेव्हा तिने माफी मागितली. परंतु, केतकीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण विसरुन त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद सुरु आहे, असे तिने लिहले होते. त्यामुळे शिवप्रेमींनी केतकीला ट्रोल केले होते.
अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल - सोशल मीडियावर एक पोस्ट करताना केतकीने धर्म-पंथाचा उल्लेख केला होता. तिने पोस्टमध्ये लिहले की, 'नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो’, असे वादग्रस्त लिखाण तिने केले होते. त्यानंतर मुंबईतील स्वप्निल जगताप या आंबेडकरी कार्यकर्त्याने तक्रार केली होती. त्यानुसार तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.