मुंबई : शेवटी नियतीनंच उत्तर दिलंय अशी टीका मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Former Mayor Kishori Pednekar ) यांनी शिंदे गटाला दिले आहे. 1985 पासून शिवसेनेची मशाल धगधगतेय. इथं येऊन नतमस्तक होणा-या प्रत्येकाच्या मनात ही मशाल धगधगत होती. निवडणूक आयोगाने तात्पुरते का असेना पण दिलेले नाव आणि चिन्ह हे अगदी समर्पक आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात चिंगारी धगधगत होती. मुंबईत राष्ट्रपती लागवट लागू करा. मुंबईचे तुकडे करूयात असे मनसुबे करणा-यांचा हेतू कधीही साध्य होणार नाही असेही त्या म्हणाल्या.
शिवसेनेत वाद :एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यानंतर त्यांनी शिवसेना तसेच शिवसेनेचे पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरती हक्क सांगितला होता. याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देताना मशाल हे चिन्ह दिलय. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे.
बाळासाहेब नेमके कोण ?एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे, या नावावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या नावात बाळासाहेब कोण ? बाळासाहेब थोरात का?, विखे पाटलांची का?, शिर्केंची ची? असे प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. असे बाळासाहेब अनेक आहेत मात्र बाळासाहेब ठाकरे एकच, त्यात ठाकरे येणं महत्वाचं होत असे पेडणेकर म्हणाल्या. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आज पेडणेकर यांच्यासह शिवसैनिकांनी भेट देवून अभिवादन केले. त्यानंतर पेडणेकर बोलत होत्या.
शिवसैनिकांमध्ये मशाल धगधगत आहे :शेवटी नियतीनंच उत्तर दिलंय. 1985 पासून शिवसेनेची मशाल धगधगतेय. शिव तीर्थावर येऊन नतमस्तक होणा-या प्रत्येकाच्या मनात ही मशाल धगधगत होती. निवडणूक आयोगानं तात्पुरत का असेना पण दिलेलं नाव आणि चिन्ह हे अगदी समर्पक आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात चिंगारी धगधगत होती. मुंबईत राष्ट्रपती लागवट लागू करा, मुंबईचे तुकडे करूयात असे मनसूबे करणा-यांचा हेतू कधीही साध्य होणार नाही. जेष्ठ शिवसैनिक, मतदार, युवा सगळे जागेवरच आहेत. आता एकच साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.