महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनी लाँडरिंग प्रकरणी छापेमारी सुरू असलेले कोण आहेत अनिल परब, राजकीय प्रवास - २० वर्षांपासून अनिल परब शिवसेनेत कार्यरत

अनिल परब मागील २० वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. अनिल दत्तात्रय परब असे, त्यांचे पूर्ण नाव आहे. बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एलएलबीचे (वकील) शिक्षण घेतले. वकीली करताना नेहमी सामाजिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्सवांचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकाचे वाटप अशा विविध कार्यक्रमातून त्यांनी राजकारणात एन्ट्री केली. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या आंदोलनात देखील ते सक्रिय होते. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने गाजवली.

अनिल परब राजकीय प्रवास
अनिल परब राजकीय प्रवास

By

Published : May 26, 2022, 10:40 AM IST

मुंबई - शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीचे छापे सुरु आहेत. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीने कारवाई केल्याचे बोलले जाते. अनिल परब कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी व राजकीय प्रवास कसा आहे, हे थोडक्यात पाहूयात.

२० वर्षांपासू शिवसेनेत कार्यरत -मागील २० वर्षांपासून अनिल परब शिवसेनेत कार्यरत आहेत. अनिल दत्तात्रय परब असे, त्यांचे पूर्ण नाव आहे. बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एलएलबीचे (वकील) शिक्षण घेतले. वकीली करताना नेहमी सामाजिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्सवांचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकाचे वाटप अशा विविध कार्यक्रमातून त्यांनी राजकारणात एन्ट्री केली. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या आंदोलनात देखील ते सक्रिय होते. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने गाजवली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी २००१ मध्ये अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली.

सलग १४ वर्षे विधानपरिषदेचे सदस्य - अनिल परब यांना २००४ मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेने विधानपरिषदेवर पाठवले. सलग १४ वर्षे (२०१८ पर्यंत) विधान परिषदेचे ते सदस्य आहेत. सन २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संसदीय कार्यमंत्री आणि परिवहन मंत्री पदाची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे दिली आहे. वांद्रे पश्चिममधील २०१५ च्या पोटनिवडणूकीची जबाबदारी अनिल परब यांच्यावर होती. शिवसेनेकडून तृप्ती सावंत उमेदवार होत्या तर काँग्रेसकडून नारायण राणे उमेदवार होते. यावेळी राणे यांचा पराभव करण्यात परब यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे अनिल परब यांच्यावर शिवसेनेकडून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

भाजपला जशास तसे उत्तर -सन २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना युतीत फुट पडली. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपने केला होता. या आरोपांना अनिल परब यांनी कायदेशीररित्या सडेतोड उत्तर दिले होते. शिवसेनेने त्यानंतर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक संख्याबळ मिळवत, झेंडा फडकवला. तसेच मनसेचे सहा नगरसेवक फोडण्यातही परब यांची मोठी कामगिरी होती.

निष्णात वकील - शिवसेनेवर आरे मेट्रो कारशेड, कांजूर कारशेड, मराठा आरक्षण, सचिन वाझे प्रकरणामुळे अनेकवेळा आरोप झाले. कायद्याच्या आधारे ठाम बाजू मांडत, विरोधकांना अनिल परब यांनी नेहमी शांत केले. सचिन वाझे प्रकरण उफाळल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शिवसेनेवर आरोप केले. त्यांना कायद्याच्या भाषेत अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

हेही वाचा -मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीचे छापे

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details