मुंबईपावसाळी अधिवेशनाच्या Monsoon Session 2022 आधी शिवसेनेने शिंदे गटाला धक्का दिला आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांना ठाकरेंनी व्हिप जारी केला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला आहे. अधिवेशनाच्या संपूर्ण काळात दररोज कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असल्याचे या पक्षादेशात म्हटले आहे. शिवसेना आणि बंडखोर शिंदे गट विधानभवनात पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत.
२२ ऑगस्टला पुढची सुनावणी होणारराज्यातील सत्तासंघर्षावरच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. येत्या २२ ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे. तर शिवसेना आणि चिन्हाचा वाद देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाच्या एकूण सहा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून यामध्ये पक्ष प्रतोद पदाचा वादाचाही विषय आहे. आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विधानसभेच्या सर्व ५५ आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आला आहे. शिवसेना प्रतोद सुनील प्रभू shiv sena pratod prabhu हे पक्षादेश काढले आहेत.