मुंबई - चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून भारतीय सीमेत घुसखोरी सुरु आहे. त्यांच्याकडून धडका मारल्या जात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्य आणि जवानांवरही दहशतवाद्यांचे हल्ले सुरु आहेत. असे असताना भारत सरकार काय करत आहे असा सवाल शिवसेनेने केला आहे. 'हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे.' असा सणसणीत टोला शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लगावला आहे.
देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे
'चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. ते घुसखोरी करीत आहेत व आपण चर्चेच्या ' फेऱ्या ' मोजत बसलो आहोत. पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे , त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची ' अलोकशाही ' राजवट आणली आहे , त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे.' असा सणसणीत टोला शिवसेनेने केंद्र सरकारला लगावला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
'हिंदुस्थानच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. कश्मीर खोऱ्यांत निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारले जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त चिंता वाढविणारे आहे. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची मनुष्यहानी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. बांदिपोरा, अनंतनाग भागात एखाद्दुसऱ्या दहशतवाद्यास कंठस्नान घातले हे ठीक, पण त्या बदल्यात आमच्या पाच जवानांचे बळी गेले. या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले? असा खडा सवाल शिवसेनेने केला आहे.
भयाने कश्मीरात लोक थांबायला तयार नाहीत