मुंबई- शिवसेना नेते अरविंद सावंत यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुलासारखे मानत होते. खुद्द बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान अटलजींकडे सावंत यांची बाजू मांडली होती. सावंत आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आता जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
वो मेरा बेटा है, गलत नही कर सकता. . . खुद्द बाळासाहेबांनी अटलजींकडे मांडली होती 'या' नेत्यांची बाजू . . . - पंतप्रधान
सरकारने एमटीएनएलचे खासगीकरण करण्याचे ठरवले होते. याविरोधात मुंबईत शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी मोर्चा काढला होता. सावंतांच्या मोर्चानंतर ही बाब अटलजींनी बाळासाहेबांच्या कानावर घातली होती.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या सरकारच्या कालावधीत अरविंद सावंत यांनी एमटीएनएलच्या खासगीकरणाविरोधात मुंबईत मोर्चा काढला होता. त्यावेळी खुद्द वाजपेयी हे मुंबईतील राज भवनात बाळासाहेबांसोबत बसले होते. सरकारविरोधात शिवसेनेच्या माणसाने मोर्चा काढल्याची बाब अटलजींच्या कानावर आली. तुमचा माणूस सरकारच्या विरोधात मोर्चा काढत असल्याचे त्यांनी बाळासाहेबांच्या कानी घातले. बाळासाहेबांनी त्यावेळी अरविंद सावंत यांची बाजू घेत, थेट वो मेरा बेटा है गलत नही कर सकता, असे म्हणत, सरकारच्या विरोधात नाही. तर एमएटीएनएलच्या खासगीकरणा विरोधात त्याने मोर्चा काढल्याचे अटलजींना सांगितले.
अटलजींनी बाळासाहेबांच्या त्या बोलण्यावरून माहिती घेऊन त्यावेळी होणारे एमटीएनएलचे खासगीकरण टाळले. अरविंद सावंत हे त्यावेळी एमटीएनएलच्या युनियनच्या अध्यक्षपदी असताना त्यांची एमटीएनएल खासगीकरण टाळल्याची मोठी लढाई जिंकली होती. आज हेच अरविंद सावंत मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत आहेत.